नवी दिल्ली : नॅशनल हेराल्ड प्रकरणी ईडीनं आज यंग इंडिया लिमिटेडचे कार्यालय सील (Office Seal) केले. हे कार्यालय हेराल्ड हाऊसच्या परिसरातच आहे. ईडीच्या या कारवाईनंतर काँग्रेस मुख्यालयात खळबळ माजली. काँग्रेसचे मोठे नेते काँग्रेस मुख्यालयात पोहचत आहेत. याशिवाय सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या घरासमोर सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आली आहे. यंग इडिया लिमिटेडचं कार्यालय सील झाल्यानंतर काँग्रेसने पत्रकार परिषद घेतली. यावेळी जयराम रमेश (Jairam Ramesh), अजय माकन आणि अभिषेक मनू सिंघवी (Abhishek Manu Singhvi) उपस्थित होते. काँग्रेस मुख्यालयासोबतच सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या घरासमोर पोलिसांची सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आली आहे.
जयराम रमेश यांनी सांगितलं, दिल्ली पोलीस आणि इतर सुरक्षा दलानं काँग्रेस मुख्यालय, सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या घरासमोर घेराव घातला. अजय माकन म्हणाले, पा ऑगस्टला काँग्रेस महागाईविरोधात राष्ट्रीय स्तरावर प्रदर्शन करणार होती. याची घोषणा शनिवारी करण्यात आली. परंतु, डीसीपींनी प्रदर्शन करण्याला परवानगी दिली नाही. त्यानंतर काँग्रेस मुख्यालय आणि राहुल-सोनिया यांच्या घराला घेराव घालण्यात आला.
Delhi Police blocking the road to AICC Headquarters has become a norm rather than an exception! Why have they just done so is mysterious… pic.twitter.com/UrZCNigNHy
— Jairam Ramesh (@Jairam_Ramesh) August 3, 2022
अभिषेक मनू सिंघवी म्हणाले, केंद्र सरकारला भीती वाटते की महागाईविरोधात लोकं एकत्र येतील. त्यामुळं भीतीचं वातावरण तयार केलं जातंय. देशातील सर्वात जुन्या पक्षाला दहशतवाद्यांसारखी वागणूक दिली जात आहे.
पोलिसांची सुरक्षा व्यवस्था वाढविल्यानंतर काँग्रेसनं त्यांच्या ट्वीटर हँडलवरून ट्वीट केलंय. सत्याची आवाज दाबला जाऊ शकत नाही. गांधींचे कार्यकर्ते ही लढाई जिंकतील. नॅशनल हेराल्डचं कार्यालय सील करणं, काँग्रेस मुख्यालयासमोर पोलिसांची सुरक्षा व्यवस्था वाढविणं, यातून हिटलरशाहीचं दर्शन होतंय.
LIVE: Congress Party briefing by @DrAMSinghvi and Shri @Jairam_Ramesh at AICC HQ.
https://t.co/A9MN61yzPA— Congress (@INCIndia) August 3, 2022