मुंबई : अनंत चतुर्दशीच्या दिवशी मुंबईतील प्रभादेवी परिसरात झालेला राडा सरवणकर पिता-पुत्राच्या अंगाशी येणार आहे. शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर (Sada Sarvankar)यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. सरवणकर यांचे पिस्तुल पोलिसांनी जप्त केलं आहे. या प्रकरणी सदा सरवणकर आणि समाधान सरवणकर यांना पोलिसांकडून समन्स बजावण्यात आले आहे.
प्रभादेवी राडा प्रकरणात सदा सरवणकर आणि समाधान सरवणकर यांची पोलिसांकडून चौकशी होणार आहे. आमदार सदा सरवणकर यांचं पिस्तुल जप्त केले आहे. तसेच फायर झालेल्या गोळीची रिकामी पुंगळी देखील पोलिसांनी तपासणीसाठी पाठवली आहे.
या प्रकरणी सदा सरवणकर आणि समाधान सरवणकर यांना पोलिसांनी समन्स बजावले आहे. दोघांनाही चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश पोलिसांनी दिले आहेत. या दोघांचा जबाब पोलिस घेणार आहेत. नेमकं काय झालं याची चौकशी पोलिस करणार आहेत.
अनंत चतुर्दशीच्या दिवशी शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर आणि शिवसेना यांच्यात तुफान राडा झाला. सदा सरवणकर यांनी गोळीबार केल्याचा आरोप शिवसेनेच्या सुनील शिंदे यांनी केला होता. या गोळीबारातून एक पोलीस जखमी होता होता वाचला होता असा दावा देखील सुनील शिंदे यांनी केला होतं. त्यानंतर सदा सरवणकर यांच्यावरही गुन्हा दाखल करण्याची मागणी शिवसेनेकडून करण्यात आली होती. अखेर सदा सरवणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी त्यांना समन्स बजावले आहे.
अनंत चतुर्थीच्या दिवशी शिंदे गट आमने सामने आले होते. स्वागत कक्षावरुन दोन्ही गटात तुफान राडा झाला. यावेळी सदा सरवणकर यांनी गोळीबार केल्याचा आरोप केला जात आहे.