…म्हणून अजित दादांनी मंत्रालयातील ‘ती’ केबिन नाकारली

| Updated on: Dec 30, 2019 | 10:51 PM

राष्ट्रवादीचे बारामती मतदारसंघाचे आमदार अजित पवार यांनी चौथ्यांदा राज्याच्या उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. मात्र, उपमुख्यमंत्री झाल्यावर अजित दादांनी मंत्रालयातील सहाव्या माळ्यावरील 'ती' केबिन स्विकारली नाही.

...म्हणून अजित दादांनी मंत्रालयातील ती केबिन नाकारली
Follow us on

मुंबई : महाराष्ट्र मंत्रिमंडळ विस्तार अखेर सोमवारी (30 डिसेंबर) विधानभवन परिसरात पार पडला. यावेळी महाविकास आघाडीतील राष्ट्रवादीचे बारामती मतदारसंघाचे आमदार अजित पवार (Deputy Chief Minister Ajit Pawar) यांनी चौथ्यांदा राज्याच्या उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. मात्र, उपमुख्यमंत्री झाल्यावर अजित दादांनी मंत्रालयातील सहाव्या माळ्यावरील ‘ती’ केबिन स्विकारली नाही. मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावरील ही तीच कृषी मंत्र्यांची केबिन आहे, जिच्या अंधश्रद्धेच्या राजकीय गोष्टी गेले 5 वर्ष मंत्रालयात गाजल्या (political superstition in mantralay).

महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या राजकीय अंधश्रद्धेवर मोठी चर्चा सुरु आहे. मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावरील कृषी मंत्रालयाच्या केबिनमध्ये ज्या नेत्याची वर्णी लागते, त्याची राजकीय कारकीर्द (political superstition in mantralay) संपुष्टात येते, अशी चर्चा गेल्या पाच वर्षांपासून मंत्रलयात रंगत आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवारांनीही ती केबिन नाकारली, अशी चर्चा आहे.

सहाव्या मजल्यावरील त्या केबिनचा इतिहास

मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावर 2014 मध्ये कृषीमंत्री आणि महसूल मंत्री म्हणून एकनाथ खडसे यांनी पदभार स्वीकारला होता. त्यानंतर दोनच वर्षात ते वादाच्या भोवऱ्यात सापडले. त्यामुळे त्यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला.

खडसे यांनी राजीनामा दिल्यानंतर 2017 मध्ये भाजपचे ज्येष्ठ नेते पांडुरंग फुंडकर यांनी कृषी मंत्रालयाचा पदभार स्वीकारला. मात्र, वर्षभरातच त्यांचा आजारपणामुळे मृत्यू झाला. पांडुरंग फुंडकर यांच्यानंतर भाजपचे विदर्भाचे आमदार अनिल बोंडे यांची कृषीमंत्री पदी वर्णी लागली. पण त्यानंतर अनिल बोंडे यांचा 2019 च्या विधानसभा निवडणुकीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या देवेंद्र भुयार यांच्याकडून पराभव झाला.

भाजप सरकारच्या कार्यकाळात आतापर्यंत जे कुणी कृषीमंत्री पदावर आले आहेत. त्यांना कोणत्या ना कोणत्या कारणासाठी ते पद सोडावे लागले. तसेच त्यांची राजकीय कारकीर्द संपत आहे, अशी चर्चा मंत्रालयात आहे.