मुंबई : मुंबई प्रीमिअर लीग टी20 स्पर्धेला (MPL T20 Mumbai Premier League) कोरोनाचा फटका बसला, की क्रिकेटमधल्या शह काटशह राजकारणाचा, असा सवाल विचारला जात आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशन (MCA) चे अध्यक्ष विजय पाटील (Vijay Patil) आणि मुंबई प्रीमियर लीगचे चेअरमन मिलिंद नार्वेकर (Milind Narvekar) यांनी स्पर्धेचे आयोजन पुढे ढकलल्याची अधिकृत घोषणा केली. पण कालच ‘बीसीसीआय’ने (BCCI) एमसीएला कोव्हिड संबंधी नियमांचे पालन करत स्पर्धा आयोजित करण्याची परवानगी दिली होती. त्यामुळे नेमकं कारण काय, हा सवाल उपस्थित होत आहे. (Politics behind T20 Mumbai Premier League Postpone Mumbai Cricket Association MCA MPL Chairman Milind Narvekar announcement)
‘एमसीए’ सचिवाचे बीसीसीआयला पत्र
‘बीसीसीआय’ने एमसीएला पाठवलेला परवानगीचा ईमेल ‘टीव्ही 9 मराठी’च्या हाती लागला आहे. एमसीएतील एका पदाधिकाऱ्याने ‘बीसीसीआय’ला पत्र ई मेल करुन मुंबई प्रीमियर लीग T-20 स्पर्धेच्या आयोजनासाठी परवानगी मागितली होती. ‘बीसीसीआय’च्या अपेक्स कौन्सिलच्या बैठकीत या विषयावर चर्चा-विचार विनिमय झाला.
IPL नंतर 15 दिवसांत MPL भरवण्याची परवानगी
त्या अनुषंगाने आयपीएल IPL स्पर्धा झाल्यानंतर 15 दिवसांत स्पर्धा आयोजन करण्याची परवानगी बीसीसीआयने एमसीएला दिली. तसंच कोव्हिड नियमांचे पालन करुन ही स्पर्धा आयोजित करण्यात यावी, असेही सांगण्यात आले. पण या परवानगी नाट्यावर शह काटशहचे राजकारण रंगले आहे.
MCA विरुद्ध BCCI
MCA अध्यक्ष आणि MPL चेअरमन यांना विश्वासात न घेता BCCI कडे सेक्रेटरींनी परवानगी मागितल्याने, परवानगी मिळाल्याच्या 24 तासात स्पर्धा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला. मुंबई प्रीमिअर लीगच्या T20 स्पर्धा आयोजनावरुन MCA तील अध्यक्ष आणि MPL चे चेअरमन विरुद्ध सेक्रेटरी, तसंच MCA विरुद्ध BCCI असे राजकारण चव्हाट्यावर आले आहे.
मिलिंद नार्वेकर यांचं ट्वीट
सध्या कोव्हिड प्रादुर्भावामुळे यंत्रणांवर असलेला ताण लक्षात घेत मुंबई प्रीमिअर लीग T20 मालिकेचा तिसरा सिझन तूर्त आयोजित करण्यात येणार नाही. प्रत्येकाची सुरक्षितता लक्षात घेत पुढील आदेशापर्यंत मालिका भरवणार नसल्याचं पत्रक जारी करण्यात आलं होतं. मुंबई प्रीमियर लीगचे चेअरमन या नात्याने मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष विजय पाटील यांच्यासह संयुक्तपणे निर्णय घेत असल्याचं ट्वीट मिलिंद नार्वेकर यांनी गुरुवारी सकाळी केलं होतं. (T20 Mumbai Premier League Postpone )
Given the current situation, President Vijay Patil Ji and I, in my capacity as the Chairman, have decided to not conduct the T20 Mumbai League till further notice.
This is our way to reduce the load on the machinery and also making sure everyone is safe. pic.twitter.com/2nHmHuNnbu
— Milind Narvekar (@NarvekarMilind_) April 29, 2021
संबंधित बातम्या :
मुंबई प्रीमिअर लीग T20 पुढे ढकलली, मिलिंद नार्वेकरांच्या पहिल्याच स्पर्धा आयोजनाला कोरोनाचा फटका
MPL ची सूत्रं स्वीकारताच मिलिंद नार्वेकरांची बॅटिंग, ठाकरे-पवारांच्या फोटोसह होर्डिंगबाजी
(Politics behind T20 Mumbai Premier League Postpone Mumbai Cricket Association MCA MPL Chairman Milind Narvekar announcement)