मुंबई : दहीहंडी उत्सवावरुन दुसऱ्या दिवशीही राजकारण सुरु आहे. दहीहंडीच्या दिवशी (Politics) राजकारणावर बोलणार नाही म्हणणारे आदित्य ठाकरे यांनी मात्र आज विरोधकांना आणि (Rebel MLA) बंडखोर आमदारांवर बोचरी टीका केली आहे. शुक्रवारी दहीहंडी कार्यक्रम मोठ्या उत्साहात झाला तात्पुरत्या मुख्यमंत्र्यांनी अनेक ठिकाणच्या कार्यक्रमांना उपस्थिती दर्शवली, हंडीही फोडली मात्र, मलाई कोणाला मिळाली म्हणत आमदारांना काय दादाजीचा ठिल्लू असे म्हणत त्यांनी आमदारांसह (Eknath Shinde) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली आहे. त्यामुळे दहीहंडी उत्सव पार पडला असतानाही मात्र, राज्यात आरोप-प्रत्यारोप हे सुरुच आहेत. काल कार्यक्रमादरम्यान विविध ठिकाणी आदित्य ठाकरे यांच्यावर वेगवेगळे आरोप झाले पण आपण या दिवशी काही बोलणार नाही म्हणणारे ठाकरे दुसऱ्या दिवशी विरोधकांवर चांगलेच बरसले.
शिवसेनेतून बंड करुन आपण एक क्रांती केल्याचे आमदार हे सांगत आहेत. शिवाय आम्ही गद्दार नाहीतर खुद्दार आहोत. त्यामुळे खरी शिवसेना ही शिंदे सेनाच आहे. या क्रांतीमुळेच शिवसेना टिकून राहिली असल्याचे बंडखोर आमदार सांगत आहेत. मात्र, ही क्रांती नाहीतर गद्दारीच आहे. आता हे सर्व वेगळ्या अविर्भावात असले तरी सर्वसामान्य जनतेला माहिती आहेच. त्यामुळे ही क्रांती नाही तर गद्दारीच असल्याचे आदित्य ठाकरे यांनी ठणकावून सांगितले आहे. शिवाय आपलं हिंदुत्व हे सर्व जाती-धर्मासाठी आहे. कुण्या जातीच्या विरोधात नसल्याचे म्हणत त्यांनी विरोधकांवर टीका केली आहे.
शिंदे गटात सहभागी झालेल्या आमदारांनी आगोदर सुरत, गुवाहटी आणि गोवा असा प्रवास केला. दरम्यानच्या काळात या गद्दारांनी गुवाहटीमध्ये मौजमजा केली पण त्यांना आसाममधला पूर नाही दिसला. हे लोक टेबलावर चढून बार मधल्यासारखे नाचत होते. हे असले प्रतिनीधी तुमचे होऊ शकतात का असा सवाल त्यांनी जनतेला केला. आता सत्तांतर होऊन दीड महिन्याचा कालावधी लोटला तरी आदित्य ठाकरे हे विरोधकांवर सडकून टीका करीत आहेत. 80 टक्के समाजकारण आणि 20 टक्के राजकारण म्हणणाऱ्यांनी त्यावेळी आसाममध्ये का मदत केली नाही. असा सवाल ठाकरे यांनी उपस्थित केला आहे.
गद्दारांनी केवळ पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याच पाठीत नाहीतर महाराष्ट्रातील शिवसैनिकांच्या पाठीत खंजीर खुपसला आहे. दिवाळीमध्ये हेच गद्दार वर्षा बंगल्यावर आले पोटभरुन जेवलेही आणि शेवटीच हेच गद्दार झाले. आमचं एवढेच चुकले की, आम्ही गद्दारांना मिठी मारुन बसलो आणि त्यांनी हाततला खंजीर आमच्या पाठीत खुपसला, पण जनतेला सर्व ज्ञात आहे. त्यामुळे खरी हिम्मत असेल तर राजीनामा द्या आणि पुन्हा निवडणुकीला सामोरे जा असा पुन्नरउच्चार आदित्य ठाकरे यांनी पुन्हा एकदा केला आहे.