मग भाजपला अडीच वर्षासाठी महापौरपद का दिलं नाही?; पूनम महाजन यांचा उद्धव ठाकरे यांना सवाल

| Updated on: Nov 07, 2022 | 5:06 PM

या सभेत महापालिका निवडणुकीचा शंखनाद होत आहे. आशिषजी हा फक्त ट्रेलर आपल्याला दिसत आहे. पण या ट्रेलरमध्येच मला भाजपचा महापौर दिसत आहे.

मग भाजपला अडीच वर्षासाठी महापौरपद का दिलं नाही?; पूनम महाजन यांचा उद्धव ठाकरे यांना सवाल
मग भाजपला अडीच वर्षासाठी महापौरपद का दिलं नाही?; पूनम महाजन यांचा उद्धव ठाकरे यांना सवाल
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबई: भाजपने (बीजेपी) मुख्यमंत्रीपदासाठीचा फिफ्टी फिफ्टीचा फॉर्म्युला पाळला नाही. त्यामुळेच आम्हाला वेगळा विचार करावा लागल्याचा दावा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून केला जात असतो. उद्धव ठाकरे यांच्या या दाव्यावर भाजपच्या नेत्या पूनम महाजन यांनी मोठं विधान केलं आहे. विधानसभा निवडणुकीनंतर तुम्हाला फिफ्टी फिफ्टीचा फॉर्म्युला आठवला. मग महापालिका (बीएमसी) निवडणुकीनंतर (इलेक्शन) हाच फॉर्म्युला का आठवला नाही? भाजपला पाच वर्षासाठी महापौरपद का दिलं नाही? असा सवाल पूनम महाजन यांनी केला आहे.

वांद्रे येथील एका सभेला संबोधित करताना पूनम महाजन यांनी फिफ्टी फिफ्टीच्या फॉर्म्युल्यावरून उद्धव ठाकरे यांची चांगलीच कोंडी केली. 2019 मध्ये लढाई लढली. तेव्हा मी उद्धव दादांना सवाल करते की, असं काय घडलं की तुम्ही बाजूला झाला? दोन मित्रात फुट पडली, असं पूनम महाजन म्हणाल्या.

हे सुद्धा वाचा

मित्राने मित्राला तेव्हा मदत करायची होती. गरज न विचारता मदत करायची होती. ती गरज महाराष्ट्राच्या जनतेची होती. जनसामान्याने शिवसेना, भाजप आणि रिपाइं युतीला मते दिली होती. महाराष्ट्राच्या कल्याणाला साथ दिली होती. तुम्ही जनतेचा अपमान केला. या युतीचा मला अभिमान आहे. तो आमच्या मित्रांना का नव्हता? असा सवालही त्यांनी केला.

फिफ्टी फिफ्टी फॉर्म्युला झाला म्हणता. त्यावर बोललं पाहिजे. पण आमच्या सर्वोच्च नेतृत्वाने सांगितलं असं काही झालच नाही आणि ठरलंही नाही. महापालिकेत विजयी झाला तेव्हा फिफ्टी फिफ्टी फॉर्म्युला का आठवला नाही? आमचा महापौर का केला नाही? तुम्ही महापालिकेत फॉर्म्युला वापरला असता तर भाजपला मुख्यमंत्रीपदाची शपथ घ्यायची गरज पडली नसती, असंही त्या म्हणाल्या.

या सभेत महापालिका निवडणुकीचा शंखनाद होत आहे. आशिषजी हा फक्त ट्रेलर आपल्याला दिसत आहे. पण या ट्रेलरमध्येच मला भाजपचा महापौर दिसत आहे. महापालिका निवडणुकीत मुंबईचा कुरूक्षेत्र होणार आहे. या कुरुक्षेत्रात आता मीही उतरले आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं.

नेहमी गुजरातकडे बोट करून महाराष्ट्रचं भल होणार नाही. तुम्हीच बाहेरच्या राज्यात उद्योगधंदे जाऊ दिले, असा दावा त्यांनी केला. आमच्याकडे कुटुंबातील व्यक्ती मुख्यमंत्री होत नाही. आता आश्वासन नाही तर निर्णय होणार. लोकांचे प्रश्न सुटणार, असंही त्या म्हणाल्या.