Postal Voting : पोस्टल मतदानात जे अधिकार पतीला तेच अधिकार आता पत्नीलाही राहणार; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय

| Updated on: Jul 25, 2022 | 5:34 PM

जे अधिकार पतीला मतदानासाठी होते ते आता पत्नीला ही लागू करण्यात येणार आहेत. अशी ही माहिती निवडणूक आयोगाकडून देण्यात आली आहे.

Postal Voting : पोस्टल मतदानात जे अधिकार पतीला तेच अधिकार आता पत्नीलाही राहणार; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
Image Credit source: Social Media
Follow us on

मुंबई : राज्यात येत्या काही दिवसातच बड्या महापालिकांच्या (Municipal Coroporation Election 2022), नगरपंचायतीच्या तसेच जिल्हा परिषदांच्या निवडणुका लागत आहे. या सर्व निवडणुका घेण्यात निवडणूक आयोगाची भूमिका सहाजिकच अत्यंत महत्त्वाची राहणार आहे. त्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने (Election Commission) आज पत्रकार परिषद घेतली आहे. त्यात निवडणूक आयोगाने आज एक मोठा निर्णय जाहीर केला आहे. पोस्टल मतदानाद्वारे (Postal Vote) पूर्वी जो माणूस नोकरीला असेल त्यांनाच मतदान करता येत असे मात्र त्यांनी या नियमात आता बदल केला आहे. पोस्टल मतदानात आता स्पाउस हा शब्द वाढवला आहे. जे अधिकार पतीला मतदानासाठी होते ते आता पत्नीला ही लागू करण्यात येणार आहेत. अशी ही माहिती निवडणूक आयोगाकडून देण्यात आली आहे. त्यामुळे अनेकांची मतदान करण्याची अडचण दूर होणार आहे.

निवडणूक कायद्यात काही बदल

निवडणूक आयोगाच्या या निर्णयाने ज्यांची मत केली जात नव्हती किंवा दूर असल्याच्या कारणास्तव मतदान करण्यात अडथळे निर्माण होत होते, त्यांची मोठी अडचण आता दूर झाली आहे. ज्या ठिकाणी आपला पती नोकरीला आहे, त्या ठिकाणाहून आता पत्नीलाही मतदान करणं आता सोपं झाला आहे. त्यामुळे सहाजिकच मतदानाचा टक्का वाढण्यास मदत होणार आहे. मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे तुम्हाला पत्रकार परिषद घेतली निवडणूक कायद्यात अलीकडेच काही बदल झाले आहेत. हे सर्व बदल 1 ऑगस्ट 2022 पासून संपूर्ण देशात लागू होणार आहेत, अशी माहिती ही मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी दिली आहे. तसेच हे नियम त्यांनी 2023 च्या एप्रिल महिन्यापर्यंत लागू राहतील, असेगी स्पष्ट करण्यात आलेले आहे.

मतदान नोंदणी होणार सोपी

यात मतदाराने दिलेली माहिती योग्य असणं अत्यंत गरजेचं आहे. याची गोपनीयता कोणी भंग केली तर त्याला शिक्षा होऊ शकते, हे कायद्याचं कठोर बंधन आहे, हे बंधन निवडणूक आयोग कर्मचाऱ्यांनाही लागू होतं. तसेच आधार कार्ड तयार करणाऱ्या एजन्सीला विशेष हॉल्ट असणार आहे, नोंदणी व बदल सुविधा ऑनलाईन सुद्धा उपलब्ध होणार आहे. तसेच ऑनलाइन सर्टिफाय करण्यात येणार आहे. आधार कार्डच्या ओटीपी द्वारे त्याची पुष्टी केली जाणार आहे. तसेच वोटर्स हेल्पलाइन अॅप द्वारे याचा वापर मतदार करू शकतात, असेही निवडणूक आयोगाकडून सांगण्यात आले आहे.तसेच बुध लेवल कर्मचारी सहा ब, क्रमांकाचा फॉर्म भरून नोंदणी करण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आलेली आहे, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी दिली आहे.