अमरावती : राज्यात सध्या सत्ता संघर्ष पेटला आहे. अचलपूर (Achalpur) मतदार संघाचे आमदार राज्यमंत्री बच्चू कडू यांना अवघ्या दोन आमदारांवर शिवसेनेने मंत्रीपद दिले. असे असतानासुद्धा ते शिवसेनेच्या बंडखोर गटात सामील झाले. गुवाहाटी येथे गेल्याने मतदारसंघांमध्ये त्यांच्याविरोधात रोष उफाळून येताना दिसत आहे. राज्यमंत्री (Minister of State) बच्चू कडू यांच्या अचलपूर मतदार संघातील अचलपूर शहर आणि चांदूरबाजार (Chandurbazar) शहरात मंत्री बच्चू कडू यांच्या विरोधात चांगलीच पोस्टरबाजी सुरु झाली आहे. या लावण्यात आलेल्या बॅनर्सवर गद्दार मंत्री, जिधर बम, उधर हम असे पोस्टर लागलेत. यावरून त्यांच्याविरोधात रोष उफाळून आल्याचे दिसत आहे.
याबाबत तक्रार पोलिसांत देण्यात आली आहे. राज्यमंत्री बच्चू कडू यांनी पक्षातील कार्यकर्त्यांना विश्वासघात केला. जनतेच्या हितासाठीच हा निर्णय घेतला आहे. अशाप्रकारे बॅनर लावण्याचा हा प्रकार नेमका कोणी केला याबद्दल आताच सांगता येणार नाही. यासंदर्भात माहिती देताना सरमपुरा पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुलभा राऊत म्हणाल्या की, आमच्या पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये राज्यमंत्री बच्चू कडू विरोधात एक पोस्टर लावण्यात आले होते. हे पोस्टर आता काढण्यात आले आहेत. राज्यात सत्ता संघर्ष पेटला असताना राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या मतदारसंघात अशाप्रकारे पोस्टर लागल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहे. सर्वसामान्यांचा नेता म्हणून परिचित असणाऱ्या बच्चू कडू यांच्या भूमिकेबद्दल अजूनही सर्वसामान्यांमध्ये संभ्रम असल्याचे दिसून येते. या पोस्टरमुळे त्यावर शिक्कामोर्तब झाला आहे.
प्रहारचे अंकुश श्रीकृष्ण तायडे यांनी पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा बच्चू कडू यांच्याकडं पाठविला आहे. अकोल्याचे पालकमंत्री बच्चू कडू यांच्याकडं राजीनामा पाठविला आहे. ते पत्रात लिहितात, माझ्या प्रहार जनशक्ती पक्षाचा प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत आहे. काही दिवसांपासून पक्षामध्ये घडत असलेल्या कृतीशी विचारांशी मी सहमत नाही. त्यामुळं मी पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा देत असल्याचं म्हटलंय. मी शिवराय, फुले, शाहू, आंबेडकरांच्या विचारांचा कार्यकर्ता आहे. माझा राजीनामा स्वीकार करावा, असं त्यांनी पत्रात म्हटलंय.