Marathi News Politics Power drama again in Britain, Prime Minister resigns in 45 days. What are the five most important reasons?
ब्रिटनमध्ये पुन्हा सत्तानाट्य, 45 दिवसांत पंतप्रधानांचा राजीनामा, पाच महत्त्वाची कारणं कोणती?
लिज यांनी करात कपात करण्याचा निर्णय घेतला होता.
45 दिवसांत पंतप्रधानांचा राजीनामा
Image Credit source: tv 9
Follow us on
मुंबई : 45 दिवसांपूर्वी ब्रिटनच्या पंतप्रधान पदाची खुर्ची सांभाळणाऱ्या लिज ट्रस यांनी शेवटी पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला. गेल्या महिन्यात ब्रिटनच्या नव्या सरकारनं एक नवीन आर्थिक योजना सादर केली होती. ती योजना अयशस्वी झाल्यानंतर ब्रिटनच्या राजनीतीत उलथापालथ घडली. कंझरव्हेटिव्ह पार्टीच्या काही नेत्यांनी मागणी केली होती की, ट्रस यांनी आपलं पद सोडून द्यावं. परंतु, राजीनामा देण्याच्या 24 तासांपूर्वी लिज यांनी राजीनामा देणार नसल्याचा दावा केला होता.
लिज यांनी करात कपात करण्याचा निर्णय घेतला होता. त्यांचा हा निर्णय चुकीचा असल्याचं सिद्ध झालं. अमेरिकेचे राष्ट्रपती जो बायडेन यांनीही त्यांचा हा निर्णय हास्यास्पद असल्याचं म्हटलं होतं.
अमेरिकेचे राष्ट्रपती जो बायडेन यांनी लिज ट्रस यांच्या निर्णयावर प्रश्न उपस्थित केले होते. त्यांच्या पक्षाच्या काही खासदारांवर टीका केली होती. त्यानंतर झालेल्या जनमत सर्वेक्षणात कंझरव्हेटिव्ह पार्टी विरोधी पक्षापेक्षा मागे गेली. या सर्वेक्षणानंतर लिज यांच्या नेतृत्वावर टीका करण्यात आली.
करात कपात करण्याचा निर्णय लिज यांना परत घ्यावा लागला. अर्थ मंत्रालयाची जबाबदारी क्वासी क्वारतेंग यांना सोपविली होती. त्यांना निलंबित करण्यात आले. ट्रस सरकारनं कंपन्यांसाठी 19 टक्क्यांवरून कर 25 टक्के वाढविण्याचा निर्णय घेतला. याचा चुकीचा संदेश लोकांपर्यंत गेला.
ब्रिटनची सत्ता हाती आल्यानंतर काही आव्हान लिज यांच्यासमोर होती. डॉलरच्या तुलनेत ब्रिटिश पौंड सतत कमी होत होता. युक्रेन आणि रशिया युद्धाचा इंधनाच्या भावावर परिणाम झाला. महागाईमुळं देशातील मध्यमवर्ग नाराज होता.
कंझरव्हेटिव्ह पक्षाच्या खासदारांचं म्हणण आहे की, पक्षाच्या नेतृत्वात बदल आवश्यक आहे. बऱ्याच खासदारांना ट्रस यांनी राजीनामा द्यावा, असं म्हंटलं. लोकांचा विश्वास संपादन करण्यात त्या अपयशी ठरल्या. आतापर्यंतच्या निर्णयानं देशात कोणतीही सुधारणा झाली नाही.