मुंबई : वडिलांच्या निधनानंतर 2014 च्या विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडे संघर्ष यात्रेतून लोकांमध्ये पोहोचल्या. या निवडणुकीत त्यांच्यासोबत सहानुभूती होती. बीड जिल्ह्यातील सहापैकी पाच जागा त्यांनी 2014 ला जिंकल्या. यानंतर त्यांची खरी कसोटी 2019 च्या लोकसभा (Pradnya Gopinath Munde) निवडणुकीत होती. यावेळीही त्यांनी बाजी मारली आणि वर्चस्व अबाधित राखलं. पंकजा मुंडेंसाठी प्रत्येक निवडणूक ही कसोटीच असते. कारण, समोर भावाचं आव्हान असतं. यावेळीही परळीत (Pradnya Gopinath Munde) बंधू धनंजय मुंडे यांच्याविरोधात पंकजा मुंडेंची प्रतिष्ठा पुन्हा एकदा पणाला लागणार आहे.
‘आई बाबा झाली’
पंकजा मुंडे यांच्या निवडणुकीतील उल्लेखनीय गोष्ट म्हणजे त्यांच्या मातोश्री प्रज्ञाताई मुंडे या देखील मुलीला मदत करत आहेत. भावनिक झालेल्या पंकजा मुडेंनी नुकतंच ‘आई बाबा झाली’ (Pradnya Gopinath Munde) अशा आशयाची पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली होती. या पोस्टने पुन्हा जुन्या आठवणींना उजाळा दिला. प्रज्ञाताई मुंडे यांनी लेकीला मदत करणं हे पंकजा मुंडेंसाठी अनेक अर्थांनी महत्त्वाचं आहे.
गोपीनाथ मुंडे यांच्या अकाली निधनानंतर पंकजा मुंडेंनी धुरा सांभाळली आणि पाच वर्षे कॅबिनेट मंत्री म्हणून काम केलं. या काळात अनेक जवळची माणसं विविध कारणांमुळे दुरावली, तर अनेक नवीन माणसं जोडलीही गेली. पण मंत्री असलेल्या पंकजा मुंडे यांच्याशी थेट संपर्क नसणं ही एक कमकुवत बाजू नेहमीच समर्थकांमध्ये (Pradnya Gopinath Munde) उत्साहावर विरजण घालणारी ठरली. हेच काम आता प्रज्ञाताई मुंडे करत आहेत.
“जनरेशन गॅप कमी करण्यास मदत”
ज्येष्ठ पत्रकार सुशील कुलकर्णी यांच्या मते, “आईला वाटलं म्हणून आई मुलीसाठी प्रचार करत आहे या पलिकडे या घटनेकडे पाहता येणार नाही. कौटुंबीक नातं आणि जिव्हाळा एवढंच याला महत्त्व आहे. परळीत प्रज्ञाताईंचं मोठं महत्त्व आहे. लोकांशी थेट संपर्क राहिला नाही हा जो आरोप होतो, त्यासाठी पंकजा मुंडेंना फायदा होईल. कारण, पंकजा मुंडे कायम लोकांमध्ये जात असल्या तरी जो जनरेशन गॅप निर्माण झालाय, तो आता राहणार नाही.”
प्रज्ञाताई मुंडे (Pradnya Gopinath Munde) सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये कधीही नसतात. पण लेकीसाठी त्यांनी स्वतः भेटीगाठी सुरु करणं हे समर्थकांमध्ये नवा उत्साह निर्माण करणारं आहे. यावर सुशील कुलकर्णी सांगतात, “प्रज्ञाताईंनी भेटीगाठी सुरु केल्या म्हणजे त्यांनी प्रचाराची धुरा सांभाळली असं होत नाही. प्रचाराची वेगळी यंत्रणा असते. पंकजा मुंडेंना परळीत प्रचार करायचाच आहे, पण राज्यभरही फिरायचं आहे. त्यामुळे पंकजा मुंडेंना याचा फायदा होईल.”
“मुलीला आधार देण्यासाठी गाठीभेटी”
निवडणूक काळात गोपीनाथ मुंडेंना प्रज्ञाताई (Pradnya Gopinath Munde) परळीत कायम मदत करत असत. पण पंकजा मुंडे यांनी 2009 च्या निवडणुकीपासून राजकारणात एंट्री घेतली आणि प्रज्ञाताईंनीही या जबाबदारीतून निवृत्ती स्वीकारली. मुंडे कुटुंबीयांचे निकटवर्तीय माजी आमदार गोविंद केंद्रे यांनी सांगितलं की, “1978 ते 2004 या कालावधीत प्रज्ञावहिनी परळी आणि परिसरात डोअर टू डोअर महिलांच्या गाठीभेटी घेऊन प्रचार करायच्या. लेकीने सक्रिय राजकारणात पदार्पण केल्यानंतर प्रज्ञावहिनींनी या जबाबदारीतून निवृत्ती स्वीकारत घरात रमल्या.”
गोविंद केंद्रे पुढे सांगतात, “प्रज्ञाताई कायम मुंडे साहेबांच्या अर्धांगिनी म्हणूनच राहिल्या. राजकारणात कधीही सक्रिय झाल्या नाही. पण त्यांना आत्ता गरज वाटली असावी. कारण मुलीला आधार द्यावा ही भावना त्यांच्या मनात असावी. मुंडे साहेबांच्या जुन्या सहकाऱ्यांची त्या भेट घेत आहेत, संपर्क तुटला असं वाटणाऱ्या जुन्या सहकाऱ्यांना यामुळे मुंडे साहेब आल्यासारखा आनंद होतो.”