मुंबई : मुंबईतील आमदारांचं प्रगस्तीपुस्तक प्रजा फाऊंडेशननं (Praja Foundation) एका सर्वेक्षणातून समोर आणलं आहे. प्रजा फाऊंडेशनने मुंबईतील आमदारांचं 2 वर्षाचं रिपोर्ट कार्ड (Report Card) मांडलंय. हा अहवाल आमदारांची विधिमंडळातील उपस्थिती, त्यांनी मांडलेले प्रश्न आणि मतदारसंघातील नागरिकांशी चर्चा करुन तयार करण्यात आलाय. या अहवालानुसार मुंबई काँग्रेसचे आमदार अमीन पटेल (Amin Patel) (81.43 टक्के) यांनी सर्वात चांगलं काम केलंय. त्यांच्यापाठोपाठ भाजपचे पराग अळवणी (79.96 टक्के) यांचं काम वाखाणण्याजोगं आहे. तर तिसरा क्रमांक शिवसेनेचे आमदार सुनील प्रभू (77.19 टक्के) यांचा लागतो. प्रजा फाऊंडेशनच्या यंदाच्या अहवालात फक्त एका आमदारांला 80 टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळाले आहेत.
प्रजा फाऊंडेशनकडून करण्यात आलेल्या या सर्वेक्षणात फक्त मुंबईतील 31 आमदारांचा समावेश आहे. मुंबईतील ज्या आमदारांकडे मंत्रिपद होतं त्यांचा या सर्वेक्षणात समावेश नाही. त्यात काँग्रेसच्या वर्षा गायकवाड, शिवसेनेचे आदित्य ठाकरे, राष्ट्रवादीचे नवाब मलिक, काँग्रेसचे अस्लम शेख, शिवसेनेचे रमेश लटके (मृत) यांच्या कामगिरीची समावेश आहे.
MLA report card of NGO @Prajafoundation ranks Congress MLA @mlaAminPatel as first, BJP’s @parag_alavani as second & Shiv Sena’s @prabhu_suneel at No 3. More details here https://t.co/Ju3VDZEDOp
— Richa Pinto (@richapintoi) July 26, 2022
>> अमीन पटेल – काँग्रेस
>> पराग अळवणी – भाजप
>> सुनील प्रभू – शिवसेना
>> अमित साटम – भाजप
>> अतुल भातखळकर – भाजप
महत्वाची बाब म्हणजे प्रजा फाऊंडेशनने केलेल्या सर्वेक्षणात मागील दोन वर्षात गुन्हेगारी पार्श्वभूमीवर असलेल्या आमदारांमध्ये 27 टक्क्यांनी वाढ झाली आहे. तेराव्या विधानसभेत पहिल्या दोन वर्षात गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले 15 आमदार होते. तर चौदाव्या विधानसभेत पहिल्या दोन वर्षात गुन्हेगारी पार्श्वभूमीवर असलेल्या आमदारांची संख्या 19 आहे.