“औरंगाबादचे नाही, तर पुण्याचं नामकरण संभाजीनगर करा”, प्रकाश आंबेडकरांकडून इतिहासाचा दाखला

| Updated on: Jan 05, 2021 | 8:58 AM

पुणे जिल्ह्याचं नामकरण संभाजीनगर करण्याची मागणी त्यांनी केली आहे. त्यामागे आंबेडकरांनी ऐतिहासिक घटनांचाही हवाला दिला आहे

औरंगाबादचे नाही, तर पुण्याचं नामकरण संभाजीनगर करा, प्रकाश आंबेडकरांकडून इतिहासाचा दाखला
प्रकाश आंबेडकर
Follow us on

पुणे : राज्याच्या राजकारणात सध्या औरंगाबाद शहराच्या नामांतराचा मुद्दा चांगलाच चर्चेत आहे (Prakash Ambedkar Demand For Renaming Pune). औरंगाबादच्या नामांतरावरुन भाजपकडून महाविकास आघाडीवर टीका केली जात आहे. पण, महाविकास आघाडीतील काँग्रेसकडून याला विरोध करण्यात येत आहे. त्यामुळे औरंगाबादच्या नामकरणावरुन राजकीय वातावरण चांगलंच तापलेलं आहे. या वादात आता वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनीही उडी घेतली आहे. पुणे जिल्ह्याचं नामकरण संभाजीनगर करण्याची मागणी त्यांनी केली आहे. त्यामागे आंबेडकरांनी ऐतिहासिक घटनांचाही हवाला दिला आहे (Prakash Ambedkar Demand For Renaming Pune).

औरंगाबाद महापालिका निवडणूक तोंडावर आलेली असताना भाजपाने औरंगाबादच्या नामकरणाचा मुद्दा पुढे आणला आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी औरंगाबादचं नामांतर संभाजीनगर करणं हा अस्मितेचा आणि जिव्हाळ्याचा विषय असल्याचं म्हटलं. मात्र, प्रकाश आंबेडकरांनी यावर आक्षेप घेतला आहे.

एबीपी माझा वृत्त वाहिनीशी बोलताना प्रकाश आंबेडकर यांनी औरंगाबाद ऐवजी पुण्याला संभाजी महाराजांचं नाव द्यावं अशी मागणी केली. “पाच वर्ष सरकारमध्ये असताना भाजपा-शिवसेनेनं औरंगाबाद शहराचं नाव का बदललं नाही? हे त्यांनी आधी स्पष्ट करावं. औरंगाबाद हे ऐतिहासिक शहर आहे. मुघलांच्या काळात औरंगाबाद शहर राजधानी होतं. औरंगाबाद ऐतिहासिक शहर आहे आणि ऐतिहासिक राहायला हवे.”

“दुसरा भाग म्हणजे संभाजी महाराज यांच्यावर पुणे जिल्ह्यात अंत्यसंस्कार झालेले आहेत. पुणे जिल्ह्यातील वडूज गावात त्यांची समाधी आहे. त्यामुळे संभाजी महाराजांच स्मरण राहावं, असं वाटत असेल तर योग्य भूमी पुणे शहर आणि जिल्हा आहे. त्यामुळे पुण्याला संभाजी महाराजांचं नाव दिलं तर अधिक उचित होईल,” असंही प्रकाश आंबेडकर म्हणाले.

Prakash Ambedkar Demand For Renaming Pune

संबंधित बातम्या :

औरंगाबादकरांनो, महापालिका हातात द्या, पहिल्याच दिवशी संभाजीनगर करुन दाखवतो : चंद्रकांत पाटील

अबू आझमी समजूतदार नेते, संभाजीनगरबाबत त्यांच्याशी चर्चा करु : संजय राऊत