पुणे : राज्यपालांनी मुंबईबाबत केलेल्या विधानावर (Bhagat Singh Koshyari Statment) सडकून टीका होत असताना वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी मात्र या विधानाचं समर्थन केलं आहे. राज्यपालांचं विधान चुकीचं नाही, त्यांनी महाराष्ट्रातील नेत्यांच्या राजकारणाला उघडं पाडलं, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत. राज्यपालांच्या विधानाबाबत त्यांना विचारण्यात आलं. त्यांनी टीव्ही 9 मराठीसोबत खास बातचित केली. तेव्हा त्यांनी कोश्यारी यांच्या विधानाचं समर्थन केलं. “राज्यपालांचं वक्तव्य चुकीचं नाही. मी त्याच्या विधानाचं समर्थन करतो. राज्यपालांच्या वक्तव्याने महाराष्ट्राचा अपमान झाला नाही. उलट राज्यातील नेत्यांचं राजकारण उघडं पाडलं. राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये प्रस्थापित नेत्यांच्या डोळ्यावरची झापडं उघडली”, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत. राज्यपालांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. त्यावरही त्यांनी भाष्य केलंय. राज्यपालांची उचलबांगडी करण्याची गरज नाही. राज्यपाल जे बोललेत ती सत्य परिस्थिती आहे, असं आंबेडकर म्हणालेत.
भाजपचे आमदार नितेश राणे यांनी राज्यपालांचं समर्थन केलं आहे. मी त्या कार्यक्रमात होतो. राज्यपाल काहीच वावगं बोलले नाही. त्यांनी मुंबईच्या उत्कर्षात योगदान देणाऱ्या त्या त्या समाजाची आठवण करून दिली. राज्यपालांनी कुणाचा अपमान केला असता तर आम्ही बोललो असतो. त्यांनी त्या त्या समाजाच्या योगदानाचा उल्लेख केला आहे. त्यांनी मराठी माणसाचा अपमान केला असं मला बिलकूल वाटत नाही, असं नितेश राणे यांनी म्हटलं आहे. ते मीडियाशी संवाद साधत होते.
मा. राज्यपालांकडून कोणाचा ही अपमान झालेला नाही..
त्यांनी फक्त त्या-त्या समाजाला त्यांच्या योगदानाचे श्रेय दिले आहे..
त्यांच्या विरोधात बोलणाऱ्यांनी..किती मराठी माणसांना मोठे किंवा श्रीमंत केले?किती मराठी तरुणांना bmc चे contract दिले?तेव्हा तुम्हाला शाह आणि अग्रवाल पाहीजे असतात..— nitesh rane (@NiteshNRane) July 30, 2022
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या वादग्रस्त विधानावर बोलण्यासाठी उद्धव ठाकरे पत्रकार परिषद घेणार आहेत. आज एक वाजता ही पत्रकार परिषद होणर आहे. खासदार संजय राऊत यांनी याबाबत ट्विट केलं आहे. “राज्यपाल महोदयांच्या बेताल विधानाचा समाचार घेण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची पत्रकार परिषद-आज दुपारी मातोश्री येथे1 वाजता”, असं ट्वि़ट राऊतांनी केलं आहे.
शिवसेना नेते संजय राऊत यांनी राज्यपालांवर टीका करतानाच शिंदेगट आणि भाजपची कान उघाडणी केली आहे. राऊतांनी एकापाठोपाठ चार ट्विट करून संताप व्यक्त केला आहे. राज्यात भाजप पुरस्कृत मुख्यमंत्री होताच मराठी माणूस आणि शिवरायांचा अपमान सुरू झाला आहे. थोडा जरी स्वाभिमान आणि अभिमान असेल तर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा घ्या. अथवा शिवसेनेचं नाव घेऊ नका, अशा शब्दात राऊत यांनी शिंदे गटावर हल्लाबोल केला आहे.