मुंबई : वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी पंढरपूरमध्ये विठ्ठल मंदिरात प्रवेश करत आंदोलन केलं. यावेळी त्यांनी राज्यातील सर्व मंदिरं खुली करण्याची सरकारकडे मागणी केली. यावर शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी जोरदार टीका केली. तसेच हा लोकांना वेठीस धरुन आंदोलन करण्याचा प्रकार असल्याचा आरोप केला. प्रकाश आंबेडकर यांनी मंदिरं खुले करण्याचं आंदोलन हाती घेतल्याने त्यांना वंचित हिंदुत्वाच्या मार्गावर जात आहे का? असा प्रश्न विचारण्यात आला (Prakash Ambedkar on Temple strike Hindutv). यावर त्यांनी आपली सविस्तर भूमिका मांडली.
प्रकाश आंबेडकर म्हणाले, “आम्ही ज्यांना गुरु मानतो अशा महात्मा फुले, महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी धर्म नाकारलेला नाही. त्यांनी धर्म हा अविभाज्य भाग आहे असंच म्हटलं आहे. त्यामुळे आम्ही या तीन महापुरुषांच्या विचारसरणीवर चालत आहोत. कुणी कुणाला मानायचं हा प्रत्येकाचा व्यक्तिगत प्रश्न आहे. कुणीही कुणावर लादता कामा नये, जबरदस्ती करता कामा नये. त्यामुळे येथे भाविकाला दर्शनाला यायचं होतं. लॉकडाऊनमुळे त्याला दर्शनाला येता येत नव्हतं. त्यामुळे आम्ही हा मुद्दा उपस्थित केला. आता कोरोना संपत आला आहे. त्यामुळे लॉकडाऊन उठवायला काहीच हरकत नाही, अशीच आमची मागणी होती.”
VIDEO : पंढरपुरात ‘वंचित’च्या आंदोलनाला अभूतपूर्व प्रतिसाद #Pandharpur #VBA #Andolan #Police @Prksh_Ambedkar #VitthalMandir pic.twitter.com/CKc5I5Ni6A
— TV9 Marathi (@TV9Marathi) August 31, 2020
‘संजय राऊतांनी घटनेचा अभ्यास सुरु केला हे चांगलं, पण अभ्यास पूर्ण झालेला नाही’
प्रकाश आंबेडकर म्हणाले, “सरकारने सांगायचं असतं आणि लोकांनी पालन करायचं असतं. मात्र, सरकारच जर चुकीचं सांगत असेल तर सरकारने सांगितलेल्या गोष्टींचं पालन करायचं की नाही हे लोकांनीच ठरवायचं आहे. शेवटी या देशाचा मालक सामान्य माणूस आहे. सरकार मालक नाही. संजय राऊतांनी राज्य घटनेचा अभ्यास सुरु केला आहे हे खूप चांगलं आहे. मात्र, त्यांचा अभ्यास पूर्ण झालेला नाही. तो अभ्यास पूर्ण झाला असता तर त्यांच्या लक्षात आलं असतं, की सरकार जेव्हा काही करत नाही तेव्हा याच घटनेने जनतेला अधिकार दिले आहेत. सरकारने काय करायला हवं याची दिशा सांगण्याचा जनतेला अधिकार आहे.”
“माझ्या आजोबाच्यावेळी मंदिराची चावी पुजाऱ्याकडे, आता मुख्यमंत्र्यांकडे”
“मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी काय चर्चा झाली असा प्रश्न विचारला असता ते म्हणाले, माझ्या आजोबांने काळाराम मंदिराचा सत्याग्रह केला तेव्हा त्या मंदिराची चावी पुजाऱ्याकडे होती. आता मी विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरात चाललो आहे, तर दुर्दैवाने पुजाऱ्याकडे चावी नाही, मुख्यमंत्र्यांकडे आहे. त्यामुळे ती चावी द्यायची की नाही हे मुख्यमंत्र्यांनी ठरवावं. मुख्यमंत्र्यांच्या आजोबांनी देखील मंदिर प्रवेशाची चळवळ केली आहे. याचीही मी त्यांना आठवण करुन दिली,” असंही प्रकाश आंबेडकर म्हणाले.
LIVE: ‘आजपासून मंदिरं खुली झाली असं समजा’, प्रकाश आंबेडकरांचं विठ्ठल मंदिरात प्रवेश करत आंदोलनhttps://t.co/oF8POEFQjB#PrakashAmbedkar #VBA #Pandharpur #TempleReopening pic.twitter.com/aCB5QMqQgd
— TV9 Marathi (@TV9Marathi) August 31, 2020
ते पुढे म्हणाले, “मुख्यमंत्र्यांनी चांगला निर्णय घेतला. त्यासाठी मी त्यांचं अभिनंदन करतो. त्यांनी लोकांच्या लोकभावनेचा आदर केला. त्यांच्या मनात कोरोना संसर्गाची भीती आहे हे मान्य आहे. त्यामुळे योग्य ती खबरदारी घेऊन लोकांनी मंदिरात यावं, अशी अपेक्षा आहे. आमच्या दृष्टीने ती भीती गैर असली तरी शासनासाठी ती रास्त आहे. त्यामुळे आम्ही 8 दिवस थांबणार आहोत. ते लवकरच याबाबत गाईडलाईन्स जारी करुन मंदिरं खुली करतील. वारकऱ्यांच्या आंदोलनाला यश आलं आहे.”
‘आंबेडकर कायद्याचे जाणकार, त्यांनी लोकांना वेठीस धरु नये’
संजय राऊत म्हणाले, “मंदिरं बंद ठेवणे हे काही कोणी आनंदाने करत नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि सरकार टप्याटप्याने अनेक गोष्टी सुरु करत आहे. लवकरच मंदिराचा विषय, रेल्वेचा विषय येतोय. पण विरोधी पक्षाने सुद्धा राज्याच्या हितासाठी संयम बाळगला तर राज्याच्या जनतेवर उपकार होतील. पंढरपूरला प्रकाश आंबेडकर यांनी जी गर्दी जमवली आहे, मला वाटत हे चित्र सकरात्मक, चांगलं नाही. वारकरी संप्रदायाशी आमची चर्चा झाली आहे. यामध्ये फिजीकल डिस्टन्सिंग महत्वाचं आहे. पंढरपूरमध्ये मंदिराबाहेर त्याचा पूर्ण फज्जा उडालेला दिसतोय. त्यातून संक्रमन वाढू शकतं.”
“प्रकाश आंबेडकर संयमी नेते आहेत. कायद्याचे जाणकार आहेत. अशा प्रमुख व्यक्तींकडून आरोग्य विषयक आणीबाणी असताना कायदेभंगाची भाषा करणे म्हणजे लोकांना हुसकावण्यासारखं आहे. प्रकाश आंबेडकर यांनी आधी आंदोलन घोषित केले. विरोधी पक्षाने त्याचं क्रेडिट घ्यायचा प्रयत्न केला असेल. मुख्यमंत्री, गृहमंत्री यांच्याशी आंबेडकर यांनी चर्चा करावी. अशी लोकांना वेठीस धरुन आंदोलन करु नयेत. तणाव निर्माण करु नये,” असंही संजय राऊत म्हणाले.
संबंधित बातम्या :
Prakash Ambedkar | पंढरपूर मंदिर प्रवेशानंतर प्रकाश आंबेडकर यांचं संपूर्ण भाषण
Prakash Ambedkar | मंदिरं खुली करण्याचं सरकारचं आश्वासन, SOP तयार करणार : प्रकाश आंबेडकर
VBA Pandharpur Protest | आंबेडकरांचं आंदोलन दुर्दैवी, काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांची टीका
संबंधित व्हिडीओ :