मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कोहिनूर मिल खरेदी प्रकरणी अंमलबजावणी संचलनालय म्हणजेच ईडीची नोटीस आली आहे. पण मनसे नेते बाळा नांदगावकर यांना 10 दिवसांपूर्वीच सांगितलं (Prakash Ambedkar) होतं, की राज ठाकरेंना ईडीची नोटीस येणार नाही, त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करा. त्यांनी तो प्रयत्न केला की नाही ते मला माहित नाही, असा दावा भारिपचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी केलाय.
कोहिनूर मिल खरेदीप्रकरणी (Kohinoor Square) मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) आणि माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे सुपुत्र उन्मेष जोशी (Unmesh Joshi) यांना ईडीने नोटीस बजावली आहे. उन्मेष जोशींना आज तर राज ठाकरे यांनी येत्या गुरुवारी म्हणजे 22 ऑगस्टला चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
भाजपकडून ब्लॅकमेलिंगचं राजकारण केलं जात असल्याचा आरोपही प्रकाश आंबेडकर यांनी केला. आणखी जे पक्षात जाणार नाहीत, त्यांनाही असाच त्रास सुरु केला जाणार आहे. ब्लॅकमेलिंगचं राजकारण केलं जातंय. पण राज ठाकरे याला बळी पडतील, असं मला वाटत नाही, असंही प्रकाश आंबेडकर म्हणाले.
काय आहे प्रकरण?
कोहिनूर सीटीएनएल (Kohinoor CTNL) ही उन्मेष जोशी (Unmesh Joshi) यांच्या मालकीची कंपनी आहे. उन्मेष जोशी, राज ठाकरे आणि त्यांचे निकटवर्तीय राजन शिरोडकर हे 2008 पर्यंत ‘कोहिनूर CTNL’ कंपनीचे शेअर होल्डर (भागीदार) होते. त्यांनी कोहिनूर मिल नंबर 3 ही जागा 2003 मध्ये लिलाव पद्धतीने 421 कोटींना खरेदी केली होती.
या जमिनीवर ‘कोहिनूर स्क्वेअर’ ही बहुमजली इमारत उभारण्यात येत आहे. या कंपनीत सरकारी क्षेत्रातील कंपनी इन्फ्रास्ट्रक्चर लीजिंग अँड फायनान्शियर सर्व्हिसेसद्वारे (आयएल अँड एफएस – IL&FS) 225 कोटी रुपयांची गुंतवणूक केली.
मात्र 2008 मध्ये IL&FS ने मोठं नुकसान सहन करत आपले 225 कोटी रुपयांचे सर्व शेअर्स केवळ 90 कोटींना कोहिनूर CTNL ला देऊन टाकले. त्याचवेळी राज ठाकरेंनीही आपले सर्व शेअर कंपनीला विकले आणि ते कंपनीतून बाहेर पडले.
आपले शेअर्स दिल्यानंतरही IL&FS या सरकारी कंपनीने उन्मेष जोशींच्या कोहिनूर सीटीएनएल कंपनीला अडव्हान्स लोन अर्थात आगाऊ कर्ज दिलं. ते कर्जही कोहिनूर सीटीएनएल कंपनी भागवू शकली नाही.
वर्ष 2011 मध्ये कोहिनूर सीटीएनएलने आपली काही मालमत्ता विकून 500 कोटी रुपयांचं कर्ज भागवण्यासाठी IL&FS सोबतच्या करारावर सह्या केल्या. या करारानंतरही IL&FS या कंपनीने पुन्हा कोहिनूर सीटीएनएल कंपनीला आणखी 135 कोटी रुपयांचं कर्ज दिलं.