मुंबई : ठाकरे सरकार चोरांचे, खुन्यांचे असून ते बरखास्त करण्यात यावे, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) करणार आहेत. आज दुपारी प्रकाश आंबेडकर यांच्या साथीने वंचितचे एक शिष्टमंडळ राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांची भेट घेऊन ही मागणी करणार आहे. (Prakash Ambedkar Will Meet Governor Bhagat Singh Koshyari Over parambir singh letter)
महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये राजकारणातील क्रिमिनल एलिमेंट आणि प्रशासनामधील क्रिमिनल एलिमेंट एकत्र येऊन काय काय घडवून आणू शकतात याचे चित्र आपण पाहात आहोत. मुंबईच्या माजी पोलीस आयुक्तांनी शंभर कोटी रुपये कसे वसूल केले हे स्पष्ट करण्यात आले आहे. हा आकडा आमच्या दृष्टीने कमी असला तरी त्यामध्ये नेक्सेस उभे राहिल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले. सोलापूरच्या पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी ठाकरे सरकारवर प्रहाल केले.
आज (सोमवार) दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास प्रकाश आंबेडकर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेणार आहेत. तसंच वंचित आघाडीकडून त्यांना निवेदन देणार आहोत. हे सरकार बरखास्त करावे मात्र सरकार बरखास्त करीत असताना सभागृह बरखास्त करू नये असेही राज्यपालांना सांगणार असल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले.
परमबीर हे विरोधकांची ‘डार्लिंग’ झाले आहेत व परमबीर सिंग (parambir Singh) यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून सरकारवर निशाणा साधीत आहेत. महाविकास आघाडी सरकारजवळ आजही चांगले बहुमत आहे. बहुमतावर कुरघोडी कराल तर आग लागेल. हा इशारा नसून वस्तुस्थिती आहे, अशी आक्रमक भूमिका आजच्या सामना अग्रलेखातून मांडण्यात आली आहे.
माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी जो आरोपांचा धुरळा उडवला आहे, त्यामुळे गृहखात्याची प्रतिमा नक्कीच मलिन झाली आहे. हा सरकारच्या प्रतिष्ठेचा प्रश्न बनला आहे व विरोधी पक्षाच्या हाती आयतेच कोलीत मिळाले आहे. परमबीर सिंग यांच्या निलंबनाची मागणी कालपर्यंत महाराष्ट्रातील विरोधी पक्ष करीत होता. परंतु एखाद्या अधिकाऱ्यामुळे सरकारे येत नाहीत व कोसळत नाहीत, हे विरोधकांनी विसरू नये!
(Prakash Ambedkar Will Meet Governor Bhagat Singh Koshyari Over parambir singh letter)
हे ही वाचा :