मुंबई : मागच्या काही दिवसांपासून ठाकरे गटातून शिंदेगटात नेते कार्यकर्ते जातच आहेत. आता ठाकरे गटाचा आणखी एक आमदार शिंदे गटाच्या मार्गावर असल्याचं बोललं जात आहे. राजकीय वर्तुळात याविषयीची चर्चा होतेय. आमदार प्रकाश फातर्फेकर शिंदेगटात जाणार असल्याची चर्चा आहे. स्वत: प्रकाश फातर्फेकर यांच्याशी टीव्ही 9 मराठीने संवाद साधला तेव्हा त्यांनी या चर्चांवर प्रतिक्रिया दिली आहे.
महानगरपालिका निवडणूक जवळ आली आहे आणि आम्ही कट्टर शिवसैनिक आहोत शंभर टक्के मुंबई महानगरपालिकेवर आमच्या झेंडा फडकणार आहे. त्यामुळे लोक घाबरलेले आहेत आणि चुकीच्या बातमी पसरवत आहे. मला दोन वेळा उद्धवसाहेबांनी आमदार केलं. नगरसेवक केलं. आम्ही उद्धवसाहेबांना सोडून कधीही कुठेही जाणार नाही, असं प्रकाश फातर्फेकर यांनी सांगितलं आहे.
आम्ही मोठ्या प्रमाणात फिरतो आहे. चेंबूरमध्ये आम्ही भरपूर काम केलेलं आहे. आमच्या विश्वास आहे की जनता आमच्या पाठिशी आहे. मुंबई महानगरपालिकेमध्ये शंभर टक्के आमचा भगवा झेंडा फडकणारच, असा विश्वास फातर्फेकर यांनी व्यक्त केलाय.
काल महानगरपालिका दवाखाना उद्घाटन होतं. मी तिथे गेलो तेव्हा खासदारांनी वार्ड ऑफिसरला फोन करून मी पण येतो आहे, असं आधीच सांगितलं होतं. मी तिथे गेलो होते. तिथे उद्घाटन केलं. त्यामुळे मी शिंदे गटात जाणार असल्याची चर्चा आहे ती अत्यंत चुकीची आहे, असा खुलासा आमदार प्रकाश फातर्फेकर यांनी केला आहे.