Navneet Rana vs Praniti Shinde : नवनीत राणांविरोधात प्रणिती शिंदेंनी लोकसभा लढवावी, काँग्रेस प्रदेश सचिवाचा आग्रह!

| Updated on: Jun 01, 2022 | 3:53 PM

नवनीत राणा या सातत्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडी सरकारवर जोरदार हल्ला चढवत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. अशावेळ काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांनी नवनीत राणांविरोधात 2024 ची लोकसभा निवडणूक लढवण्याचा आग्रह काँग्रेस पदाधिकाऱ्याकडून करण्यात येतोय!

Navneet Rana vs Praniti Shinde : नवनीत राणांविरोधात प्रणिती शिंदेंनी लोकसभा लढवावी, काँग्रेस प्रदेश सचिवाचा आग्रह!
नवनीत राणा, प्रणिती शिंदे
Image Credit source: TV9
Follow us on

अमरावती : हनुमान चालिसाच्या मुद्द्यावरुन खासदार नवनीत राणा (Navneet Rana) आणि आमदार रवी राणा चांगलेच चर्चेत आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानसमोर हनुमान चालिसा (Hanuman Chalisa) पठणाचं आव्हान देणाऱ्या राणा दाम्पत्याला अटक झाली. पुढे 12 दिवस त्यांना जेलवारी करावी लागली. त्यानंतर रुग्णालय ते दिल्ली आणि नंतर अमरावती असा प्रवास राज्यानं पाहिला. मात्र, नवनीत राणा या सातत्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडी सरकारवर जोरदार हल्ला चढवत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. अशावेळ काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे (Praniti Shinde) यांनी नवनीत राणांविरोधात 2024 ची लोकसभा निवडणूक लढवण्याचा आग्रह काँग्रेस पदाधिकाऱ्याकडून करण्यात येतोय!

प्रणिती शिंदे अमरावतीतून लोकसभा लढणार?

नवनीत राणा यांच्याविरोधात आमदार प्रणिती शिंदे यांनी अमरावती लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवावी. अशी मागणी करणारं पत्र काँग्रेसचे प्रदेश सचिव नंदकिशोर कुयटे यांनी प्रणिती शिंदेंना लिहिलं आहे. आतापासूनच तयारी केवल्यास 2024 मध्ये अमरावतीमध्ये काँग्रेसचा खासदार निवडून येऊ शकतो, असा दावाही त्यांनी केलाय. या पत्रानंतर प्रणिती शिंदे काय निर्णय घेणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

नवनीत राणांकडून आनंदराव अडसूळ यांचा पराभव

दरम्यान, शिवसेनेचे मोठे नेते आणि माजी खासदार आनंदराव अडसूळ यांचा पराभव करत नवनित राणा खासदार बनल्या आहेत. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी अडसूळ यांचा पराभव केला. यावेळी नवनित राणा यांना राष्ट्रवादी काँग्रेसनं मदत केली होती. तत्पूर्वी 2014 मध्येही नवनित राणा यांनी लोकसभा निवडणूक लढवली होती. मात्र, त्यावेळी त्यांना अडसूळ यांच्याकडून पराभव पत्करावा लागला होता.

हे सुद्धा वाचा