मुंबई : भाजप नेते आणि माजी खासदार उदयनराजे यांनी शिवसेनेचं नाव बदलून ठाकरे सेना करण्याचा खोचक सल्ला दिल्यानंतर शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी उदयनराजे भोसले यांच्यावर जोरदार टीका केली (Prasad Lad criticize Sanjay Raut). या टीकेनंतर भाजपकडून त्याला प्रत्युत्तर देण्यात येत आहे. भाजपचे विधान परिषदेचे आमदार प्रसाद लाड यांनी संजय राऊत त्यांचं आडनाव बदलून खान करणार असावेत, असं म्हणत टीका केली (Prasad Lad criticize Sanjay Raut).
प्रसाद लाड म्हणाले, “संजय राऊत त्यांचं आडनाव बदलून खान करणार असावेत. छत्रपतींच्या विरोधात बोलणारी ही मुघलांची औलाद आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी छत्रपतींवर प्रेम केलं, छत्रपतींच्या आशिर्वादाने शिवसेना बनवली. त्या पक्षाचे खासदार छत्रपतींच्या वंशजांकडे पुरावे मागत असतील, तर ते निश्चितपणे सत्तेसाठी लाचार असलेली मुघलांची औलाद आहेत.”
शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संजय राऊत यांना यासाठी छत्रपतींच्या वंशजांची, संपूर्ण महाराष्ट्राची, देशाची आणि सर्व शिवप्रेमींची माफी मागायला सांगावी. नाहीतर हा शिवरायांचा, महाराष्ट्राचा आणि देशाचा अपमान असेल, असंही प्रसाद लाड यांनी सांगितलं.
संजय राऊत काय म्हणाले होते?
भाजपचे नेते आणि माजी खासदार उदयनराजे भोसले यांनी छत्रपती शिवाज महाराजांवरील वादग्रस्त पुस्तकावर बोलताना शिवसेनेवर सडकून टीका केली होती. शिवसेनेने “शिवसेना” हे नाव ठेवताना छत्रपतींच्या वंशजांची परवानगी घेतली होती का? असा प्रश्न केला होता. तसेच शिवसेनेचं नाव बदलून ठाकरे सेना करा असा खोचक सल्लाही उदयनराजे यांनी शिवसेनेला दिला होता. यावर संजय राऊत उदयनराजे भोसलेंवर हल्लाबोल केला.
संजय राऊत म्हणाले, उदयनराजेंनी शिवसेना हे नाव ठेवताना वंशजांना विचारलं होतं का असा प्रश्न करत आहेत. मात्र, त्यांनी ते वंशज असल्याचे पुरावे घेऊन यावेत. छत्रपती शिवाजी महाराज हे या विश्वाचं दैवत आहे. आम्ही जेव्हा गणपतीची पूजा करतो तेव्हा तुझी पूजा करु का म्हणून विचारायला जात नाही.”
संबंधित बातम्या:
उदयनराजेंनी वंशज असल्याचे पुरावे घेऊन यावे : संजय राऊत
जाणता राजा वाद : उदयनराजेंना शरद पवारांचं पहिलं उत्तर