सर्व आमदारांनी ठरवलंय की एकनाथ शिंदे जो निर्णय घेतील तो आम्हाला शिरसावंदअसेल; आमदार प्रताप सरनाईक

| Updated on: Jul 20, 2022 | 5:13 PM

सुप्रीम कोर्टात जी लढाई सुरु होती ती 1ऑगस्ट ला सुनावणी होणार आहे. पंरंतु उद्या राष्ट्रपती पदाच्या निवडणीकीची मतमोजणी होणार आहे त्याचा आम्हला विश्वास आहे की तो ही निर्णय आमच्या बाजूने लागेल. या नंतर सविस्तर मंत्री मंडळ विस्तार होईल. पंरंतु आम्ही सर्व आमदारांनी ठरवलं आहे की एकनाथ शिंदे जो निर्णय घेतील तो आम्हाला शिर्षावंद असेल असे प्रताप सरनाईक म्हणाले.

सर्व आमदारांनी ठरवलंय की एकनाथ शिंदे जो निर्णय घेतील तो आम्हाला शिरसावंदअसेल; आमदार प्रताप सरनाईक
Follow us on

मुंबई : एकनाथ शिंदे(Eknath Shinde) यांच्या बंडानमुळे महाराष्ट्रात मोठा राजकीय भूकंप झाला. 40 पेक्षा जास्त आमदार शिंदे गटासोबत गेले आहेत. या शिंदे गटातील एकजूट कायम असल्याचे दाखवून देणार वक्तव्य आमदार प्रताप सरनाईक(Pratap Sarnaik) केले आहे. सर्व आमदारांनी ठरवलंय की एकनाथ शिंदे जो निर्णय घेतील तो आम्हाला शिर्षावंद असेल असे प्रताप सरनाईक यांनी म्हंटले आहे. शिंदे गटाला मिळणारा पाठिंबा वाढत आहे. आमदार तसेच विविध महापालिका, नगरपरिषदचे नगरसेवक यांच्यासह आता खासदारही शिंदे गटात सामील झाले आहेत.

सुप्रीम कोर्टात जी लढाई सुरु होती ती 1ऑगस्ट ला सुनावणी होणार आहे. पंरंतु उद्या राष्ट्रपती पदाच्या निवडणीकीची मतमोजणी होणार आहे त्याचा आम्हला विश्वास आहे की तो ही निर्णय आमच्या बाजूने लागेल. या नंतर सविस्तर मंत्री मंडळ विस्तार होईल. पंरंतु आम्ही सर्व आमदारांनी ठरवलं आहे की एकनाथ शिंदे जो निर्णय घेतील तो आम्हाला शिर्षावंद असेल असे प्रताप सरनाईक म्हणाले.

आमदारांच्या अपात्रतेचा फैसला 1 ऑगस्टला होणार

शिंदे गटासोबत गेलेल्या आमदारांमुळे ठाकरे सरकार (Uddhav Thackeray) पडलं आणि राज्यात शिंदे सरकार (Eknath Shinde) आलं मात्र या सरकार विरोधात तसेच 16 आमदारांविरोधात ठाकरेंनी सुप्रीम कोर्टात (Supreme Court) धाव घेतली. तसेच एक नाही दोन नाही तीन नाही, तब्बल चार याचिका दाखल केल्या. या याचिकेवरती आज सुप्रीम कोर्टात हाय व्होल्टेज सुनावणी पार पडली. या सुनावणी दरम्यान दोन्ही बाजूच्या वकिलांकडून घमासान युक्तीवाद झाला. शिंदे यांची बाजू हरीश साळवे यांनी लढवली तर शिवसेनेचे वकील म्हणून कपिल सिब्बल हे ठाकरे गटाचे बाजू मांडत होते. जोरदार युक्तिवादानंतर कपिल सिब्बल यांनी कोर्टाकडे पुढची तारीख मागितली त्याप्रमाणे सुप्रीम कोर्टाने शिंदे सरकारला वेळ देत पुढची तारीख दिली आहे. तसचे वेळ वाढवून हरीश साळवे यांनीही मागितली होती. दोन्ही बाजू ऐकल्यानंतर ही निर्णय कोर्टानं दिला आहे. 1 ऑगस्टला पुढची सुनावणी पार पडणार आहे. तर कागदपत्रं सादर करण्यासाठी त्यांना 27 जुलैपर्यंतचा वेळ देण्यात आलाय.

OBC आरक्षणावर प्रतिक्रिया

ओबीसींच्या राजकीय आरक्षणाला आज सर्वोच्च न्यायालयाने मंजुरी दिली. जनसामान्यांच्या या सरकारने दिलेला शब्द पाळला आहे. सर्व ओबीसी समाजबांधवांचे व आरक्षणासाठी लढणाऱ्या प्रत्येकाचे हार्दिक अभिनंदन, अशी प्रतिक्रिया आमदार प्रताप सरनाईक यांनी दिली आहे.

ठाणेकरांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार

ठाणे शहराची लोकसंख्या जास्तीत जास्त वाढत चालली आहे. त्यामुळे वाहनांची संख्या वाढत आहे. मेट्रोच काम चालू आहे. त्यामुळे रस्त्यावर खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहतूक कोंडी होत आहे. परंतु मुख्यमंत्री ठाण्याचे असल्याने ठाणे करांना देखील अपेक्षा आहे. त्या मुळे वाहतूक कोंडीला भविष्यात सामोरे जावे लागणर नाही याची खात्री आहे. ठाणे आणि मिरभाईंदरच्या विकासासाठी मुख्यमंत्र्यानी 900 कोटी रुपये दिलेले आहेत.ओवळा माजिवडा साठी जास्तीत जास्त निधी देण्याचा प्रयत्न आहे. 200कोटी ठाणे महापालिका आणि मीरा-भाईंदर महापालिकेला वर्ग केले आहेत अशी माहिती प्रताप सरनाईक यांनी दिली.