पुणे : “मुंबई महापालिका निवडणूक (BMC Election) भाजप स्वबळावर लढणार आहे. बाकी निवडणूक जाहीर झाल्यावर बघू. मनसेबाबत पक्ष विचार करेल” असं म्हणत मनसेसोबत निवडणुकीनंतर युती करण्याचा ऑप्शन भाजपने खुला ठेवला आहे. विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांनी पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलताना हे वक्तव्य केले. (Pravin Darekar says BJP to contest BMC election alone party will think about uniting with MNS)
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नवीन झेंड्याचे अनावरण आणि शिवसेनेसोबत काडीमोड झाल्यापासूनच मनसे-भाजप युतीच्या चर्चा रंगल्या होत्या. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि भाजप नेत्यांच्या भेटीगाठींनंतर या चर्चांना हवा मिळत असे. दोन्ही पक्षांकडून कधीच युतीच्या चर्चांना अधिकृत दुजोरा मिळाला नाही, परंतु दरेकरांनी गरज पडल्यास युती करण्याचे एकप्रकारे संकेत दिल्याचे दिसते.
दरम्यान, बिहार विधानसभा आणि देशभरात झालेल्या पोटनिवडणुकांमध्ये सुशिक्षित तरुणांनी भाजपला पसंती दिल्याचे दिसून आले. राज्यातील पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीतही हाच ट्रेंड दिसून येईल, असेही प्रवीण दरेकर म्हणाले.
“राज्यातील आगामी पदवधीर मतदारसंघाच्या निवडणुका महत्त्वाच्या आहेत. चंद्रकांत पाटील यांनी दोन वेळा पुणे पदवीधर मतदारसंघाचे नेतृत्त्व केले आहे. त्यांनी पदवीधरांचे अनेक प्रश्न सोडवले आहेत. त्यामुळे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजपला यंदा यश मिळेल. गेल्या काही दिवसांत बिहार आणि देशाच्या इतर भागांमध्ये झालेल्या पोटनिवडणुकांमध्ये पदवीधर तरुणांना भाजपला मतदान केल्याचे दिसून आले. त्यामुळे राज्यातील पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीतही हाच ट्रेंड कायम राहील” असे दरेकर यांनी सांगितले.
पुण्यातील भाजप नेत्या मेधा कुलकर्णी या पक्षावर नाराज नसल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. मेधाताई प्रचारात फित आहेत. त्या पक्षाला नवीन नाहीत किंवा त्यांच्यासाठी पक्ष नवीन नाही. त्यांचं काय करायचे हे आम्ही बघू, असेही दरेकर यांनी सांगितले.
भाजपचे मिशन मुंबई
गेल्या अनेक वर्षांपासून मुंबई महानगरपालिकेवर शिवसेनेची सत्ता आहे. मध्यंतरीच्या काळात राज्यातील इतर निवडणुकांमध्ये शिवसेनेची घसरण झाली असली तरी आजवर सेनेचा मुंबई महानगरपालिकेचा किल्ला अभेद्य राहिला आहे. त्यामुळे शिवसेनेच्या नाकावर टिच्चून महानगरपालिकेची आगामी निवडणूक जिंकायचीच, असा चंग यंदा भाजपने बांधला आहे. नुकत्याच झालेल्या भाजपच्या कार्यकारिणी बैठकीनंतर विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी महापालिकेवर भाजपचा भगवा फडकवण्याचा एल्गार केला. (Pravin Darekar says BJP to contest BMC election alone party will think about uniting with MNS)
राज ठाकरेंच्या वीजबिल माफीच्या आंदोलनात भाजपही; बावनकुळेंचं मोठं विधानhttps://t.co/AFtTCybaaf#chandrashekharbawankule #bjp #maharashtrapolitics #maharashtragovt #nitinraut @cbawankule #rajthackeray #mns
— TV9 Marathi (@TV9Marathi) November 19, 2020
संबंधित बातम्या :
देशभरात तरुणांची भाजपला पसंती; पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत हाच ट्रेंड दिसेल: दरेकर
(Pravin Darekar says BJP to contest BMC election alone party will think about uniting with MNS)