ब्रिटीशांना लाजवेल असा राज्य सरकारचा कारभार, प्रविण दरेकरांचं टीकास्त्र

| Updated on: Feb 16, 2021 | 5:11 PM

ब्रिटीशांना लाजवेल असा कारभार राज्य सरकारचा सुरू असल्याचा आरोप विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी केलाय. (Pravin Darekar MVA Government)

ब्रिटीशांना लाजवेल असा राज्य सरकारचा कारभार, प्रविण दरेकरांचं टीकास्त्र
प्रवीण दरेकर, विधानपरिषद विरोधी पक्षनेते
Follow us on

नांदेड: विधानपरिषेदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी राज्य सरकारवर विविध मुद्यांवरुन निशाणा साधला आहे. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण, मराठवाडा वॉटर ग्रीड प्रकरण, वीज पुरवठा खंडित करणे यावरुन दरेकर यांनी राज्य सरकारवर टीका केली. ब्रिटीशांना लाजवेल असा राज्य सरकारचा कारभार सुरू असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी केलाय. पूजा चव्हाण च्या मृत्यूला दहा दिवस उलटले तरी अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही, असंही ते म्हणाले. (Pravin Darekar slams MVA Government over various issue including Pooja Chavan Suicide case)

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण

पूजा चव्हाण या तरुणीच्या मृत्यूला 10 दिवस उलटले तरी अद्याप गुन्हा दाखल केलेला नाही. त्यामुळे पुरावे नष्ठ करण्यासाठी गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केली जातेय, असा आरोप विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी केलाय. संजय राठोड यांनी राजीनामा दिला असेल तर स्वागत आहे पण त्यांचा राजीनामा मंजूर करून प्रकरणाची सखोल चौकशी करावी अशी मागणी विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी केलीय.

जुलमी पद्धतीनं वीज तोडणी

महाराष्ट्र सरकारच्या मंत्र्यांनी वाढीव वीज बिलाबद्दल विविध आश्वासनं दिली. मात्र, आता पूर्वसूचना दिल्याशिवाय वीज पुरवठा खंडित करण्यात येत आहे. हे चुकीचे आहे. सरकारने 300 युनिट पर्यंत वीज मोफत देण्याची घोषणा केली होती. सरकारनं ते आश्वासनं पूर्ण केलं नाही. महावितरणकडून जुलमी पध्दतीने ग्राहकांची वीज तोडली जातेय, असं प्रविण दरेकर म्हणाले

राजकीय द्वेषापोटी वॉटर ग्रीड प्रकल्प बासनात

देवेंद्र फडणवीस सरकारनं मराठवाडा वॉटर ग्रीड प्रकल्प आणला होता. मात्र, राजकीय आकसापोटी मराठवाडा वॉटर ग्रीड प्रकल्प बासनात गुंडाळला, असा आरोप देरकर यांनी महाविकास आघाडी सरकारवर केला आहे.

इंधन दरवाढ

इंधनावरचे कर कमी करण्यासाठी सरकारचेच लोक आंदोलन करतायत. देवेंद्र फडवणीस यांच्या काळात टॅक्स कमी करण्यात आले होते, यावर अजितदादांनी भूमिका घेतली तर इंधनाचे दर कमी होतील, असंही प्रविण दरेकर म्हणाले. केंद्रीय अर्थसंकल्पात तीन लाख पाच हजार कोटी महाराष्ट्राच्या वाट्याला आले आहेत. केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पात महाराष्ट्राला वाटाण्याच्या अक्षदा लावण्यात आला, हा चुकीचा आरोप असल्याचे दरेकर म्हणाले.

संबंधित बातम्या:

‘शिवसेना शरद पवारांच्या चरणी लीन झाली’, प्रवीण दरेकरांचा शिवसेनेला चिमटा

मेट्रो कारशेडचा निर्णय अहंकारातून घेतल्यानेच प्रकल्प रेंगाळला; दरेकरांचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल

(Pravin Darekar slams MVA Government over various issue including Pooja Chavan Suicide case)