नवी दिल्ली : आज जशा राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडीत घडत आहेत, तशा दिल्लीच्या राजकारणातही अनेक मोठ्या घडामोडी घडत आहे. राष्ट्रपतीपदाची निवडणूक जाहीर (President Electon) झाल्यापासूनच विरोधकही या निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. त्यासाठी ममता बॅनर्जी यांनी पुढाकार घेत शरद पवारांचं (Sharad Pawar) नवा पुढे केलं. त्यासाठी आज दिल्लीत एक बैठकही पार पडली मात्र बैठकीनंतर शरद पवारांनी निवडणूक लढवण्यास नकार दिल्याचे सांगण्यात आलं. त्यानंतर या पदासाठी निवडणूक लढवण्याकरता फारुख अब्दुल्ला (Farukh Abdulla) यांचं नाव चर्चेत असल्याच्या बातम्याही समोर आल्या. तसेच राजनाथ सिंह हेही विरोधकांशी चर्चा करणार असल्याची माहितीही देण्यात आली. मात्र पवारांनी नकार का दिला? हा प्रश्न सर्वानाच पडणे सहाजिक होतं. आता खुद्द पवारांनीच या प्रश्नाचं उत्तर दिलंय.
राष्ट्रपती पदासाठी विरोधी पक्षाच्या नेत्यांकडून शरद पवार यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवण्यात आला. मात्र, शरद पवार यांनी तो नम्रपणे नाकारला. त्याबाबतचं ट्वीट पवार यांनी केलंय. दिल्लीत झालेल्या बैठकीत राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी उमेदवार म्हणून माझं नाव सुचवल्याबद्दल विरोधी पक्षाच्या नेत्यांचे मी मनापासून आभार मानतो. पण नम्रपणे सांगतो की मी माझ्या उमेदवारीचा प्रस्ताव नम्रपणे नाकारला आहे. सर्वसामान्य नागरिकांच्या कल्याणासाठी सेवा सुरु ठेवण्यात मला आनंद आहे, असे ट्विट शरद पवार यांच्याकडून करण्यात आलंय.
I sincerely appreciate the leaders of opposition parties for suggesting my name as a candidate for the election of the President of India, at the meeting held in Delhi. However I like to state that I have humbly declined the proposal of my candidature. pic.twitter.com/j9lTFFJMUX
— Sharad Pawar (@PawarSpeaks) June 15, 2022
त्यानंतर ममता बॅनर्जी यांनी फारुख अब्दुल्ला यांच्या नावाचीही चर्चा केली होती. मात्र ओमर अब्दुल्ला यांनी त्यांच्या नावाला विरोध केल्याच्याही बातम्या आल्या. त्यानंतरही ममता यांनी दोन नावे सुचवली आहेत. त्यापैकी एकाचे नाव गोपाळ कृष्ण गांधी आणि दुसऱ्याचे नाव फारुख अब्दुल्ला आहे. याशिवाय एनके प्रेमचंद्रन यांचे नाव इतरांनीही सुचवले होते, त्यामुळे आता विरोधकांचा उमेदवार कोण असणार? याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. आता विरोधकांकडून कुणाला उमेदवारी दिली जाते हा सस्पेन्सही लवकच संपेल. तसेच भाजपकडूनही अजून कुणाच्या नावावर शिक्कामोर्तब झालेलं नाही.