साडी, टी–शर्ट नंतर ‘मोदी टिकली’ बाजारात

| Updated on: Jul 05, 2019 | 4:09 PM

नवी दिल्ली : सध्या देशभर लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरु आहे. गेल्या काही दिवसांपासून उमेदवारी अर्ज भरण्यासह प्रचाराच्या कामालाही सुरुवात झाली आहे. मतदाराचे मत आपल्याला मिळावे या हेतूनं सर्वत्र विविध शक्कल लढवून मतदारांना आकर्षित केलं जात आहे. काही दिवसांपूर्वी बाजारात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे फोटो असलेली साडी, टी-शर्ट विक्रीस आले होते. त्यानंतर आता महिला मतदारांना आकर्षिक करण्यासाठी […]

साडी, टी–शर्ट नंतर मोदी टिकली बाजारात
Follow us on

नवी दिल्ली : सध्या देशभर लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरु आहे. गेल्या काही दिवसांपासून उमेदवारी अर्ज भरण्यासह प्रचाराच्या कामालाही सुरुवात झाली आहे. मतदाराचे मत आपल्याला मिळावे या हेतूनं सर्वत्र विविध शक्कल लढवून मतदारांना आकर्षित केलं जात आहे. काही दिवसांपूर्वी बाजारात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे फोटो असलेली साडी, टी-शर्ट विक्रीस आले होते. त्यानंतर आता महिला मतदारांना आकर्षिक करण्यासाठी नरेंद्र मोदी यांचे छायाचित्र असलेले टिकल्यांचे पाकीटही छापण्यात आलं आहे. सध्या सोशल मीडियावर या टिकल्यांच्या पाकिटाचा फोटो व्हायरल होत आहे. तसेच या फोटोवरुन नेटकऱ्यांनी मोदींना ट्रोलही केले आहे.

सध्या व्हायरल होणाऱ्या या टिकल्यांच्या पाकिटावर एका बाजूला नरेंद्र मोदीचे चित्र पाहायला मिळत आहे. तर दुसऱ्या बाजूला भाजपचे निवडणूक चिन्ह छापण्यात आलं आहे. यावर ‘पारस फॅन्सी बिंदी’ असे लिहिण्यात आले आहे. या टिकल्यांच्या पाकीटाचा फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यावर राजकीय वर्तुळातून संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त होत असून अनेकजण भाजपची खिल्ली उडवताना दिसत आहे. याबाबत नेटकऱ्यांनी मोंदीना ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे काहींनी तर तुम्ही टिकली लावायचे सोडणार नाही ना? असा प्रश्न उपस्थित केला आहे.

 

 

 

 

सध्या व्हायरल होणाऱ्या या टिकल्यांच्या पाकीटावरील फोटो खरा आहे की खोटा? याबाबत अद्याप खात्री पटलेली नाही. दरम्यान काही दिवसांपूर्वी विविध ठिकाणी मोदींचे चित्र असलेली साडी व टी-शर्ट, टोपी, कप बाजारात विक्रीस आले होते. त्यानंतरही नेटकऱ्यांनी अशाचप्रकारे मोदींची खिल्ली उडवली होती.