पालकमंत्र्यांनी आत्मपरिक्षण करावं, प्रीतम मुंडेंचा टोला, अचानक जिल्ह्यात आल्याने उशिरा शहाणपण, धनंजय मुंडेंचं प्रत्युत्तर

| Updated on: Apr 19, 2021 | 12:10 AM

राज्याचे सामाजिक न्यायमंत्री आणि बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे आणि भाजप खासदार प्रीतम मुंडे यांच्या चांगलंच वाकयुद्ध रंगलंय.

पालकमंत्र्यांनी आत्मपरिक्षण करावं, प्रीतम मुंडेंचा टोला, अचानक जिल्ह्यात आल्याने उशिरा शहाणपण, धनंजय मुंडेंचं प्रत्युत्तर
Follow us on

बीड : राज्याचे सामाजिक न्यायमंत्री आणि बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे आणि भाजप खासदार प्रीतम मुंडे यांच्या चांगलंच वाकयुद्ध रंगलंय. बीडमधील कोरोना परिस्थिती हाताळण्यात आणि जिल्ह्याच्या विकासासाठी निधी आणण्यात धनंजय मुंडे अपयश ठरल्याची टीका करत प्रीतम मुंडे यांनी त्यांना आत्मपरिक्षणाचा सल्ला दिला. त्यावर धनंजय मुंडे यांनी खासदार प्रीतम मुंडेंवर पलटवार करत त्यांना अचानक जिल्हयात आल्यानं उशिरा शहाणपण आल्याचा टोला लगावला (Pritam Munde and Dhananjay Munde criticize each other on Beed covid situation).

खासदार प्रीतम मुंडे म्हणाल्या, “धनंजय मुंडे यांनी स्वतः आत्मपरिक्षण करावं, त्यांच्या कामाची पाहणी करावी. मी जिल्ह्याची लोक प्रतिनिधी म्हणून कोठेही कमी पडणार नाही. ही माझी जबाबदारी आहे. माझ्या आणि माझ्या लोकांच्या मते मी ती जबाबदारी चांगल्या पद्धतीने पार पाडतेय. आज जिल्ह्यात औषधांचा तटवडा आणि आरोग्य यंत्रणांवर येणारा ताण या सगळ्या गोष्टी जिल्ह्याच्या सत्ताधाऱ्यांनी बघण्याची आवश्यकता आहे. पंकजा मुंडे जिल्ह्याच्या पालकमंत्री असताना बीडला कधीही काहीही कमी पडलं नाही. जिल्ह्याची झोळी फाटेल इतका निधी पंकजा मुंडेंनी आणला. कुठलाही निधी मिळवण्यात त्यावेळी बीड जिल्हा एक नंबरवर होता.”

“खासदारांना अचानक जिल्ह्यात आल्याने उशिरा शहाणपण”

प्रीतम मुंडे यांच्या या वक्तव्यानंतर धनंजय मुंडे यांनी त्यांना प्रत्युत्तर दिलं. धनंजय मुंडे म्हणाले, “आत्मपरिक्षण मी करावं की माजी पालकमंत्री पंकजा मुंडे आणि खासदार प्रीतम मुंडे यांनी करावं हे त्यांना माहिती आहे. मुळात त्यांनी अर्धवट माहितीवर, खोट्या माहितीवर असे आरोप करणं चुकीचं आहे. हे आरोप वस्तूस्थितीला धरून नाही. अशा परिस्थितीत मी असेल, माजी पालकमंत्री आणि खासदार या सर्वांनी एकत्र येऊन बीड जिल्ह्याला कोविडच्या संकटातून बाहेर काढणे आवश्यक आहे. तुम्ही मला दोष दिला, मी तुम्हाला दोष दिला, असे दोष अनेकदा देता येतील. अचानक बऱ्याच दिवसांनी खासदार प्रीतम मुंडे जिल्ह्यात आल्यानंतर काही परिस्थितीची त्यांना जाणीव झाली. एखाद्याला उशिरा शहाणपण आलं तर ते का आलं असं म्हणता येत नाही.”

“या सर्व परिस्थितीत आम्ही आणि प्रशासन पूर्णपणाने लक्ष घालून आहोत. कुठल्याही कोविडच्या किंवा नॉन कोविड रुग्णाची आरोग्याच्या दृष्टीने कोणतीही अडचण दूर होणार नाही. याची काळजी आम्ही सर्वजण घेत आहोत,” असंही धनंजय मुंडे यांनी नमूद केलं.

हेही वाचा :

बीडमध्ये कोरोना लसीचा तुटवडा, पंकजा मुंडे म्हणतात, सत्ताधाऱ्यांना माफियांचे हित माहित, धनंजय मुंडेंवर अप्रत्यक्ष निशाणा

अंबाजोगाईत कोरोनाचा हाहाकार, एकाच सरणावर 8 जणांचा अंत्यविधी करण्याची वेळ

Beed Lockdown Update | बीड जिल्ह्यातील नागरिकांना दिलासा, लॉकडाऊनमध्ये सकाळी 7 ते दुपारी 1 पर्यंत शिथिलता

प्रीतम मुंडे यांचा व्हिडीओ पाहा :

धनंजय मुंडे यांचा व्हिडीओ पाहा :

Pritam Munde and Dhananjay Munde criticize each other on Beed covid situation