परळी – लोकनेते गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde) यांचा आज आठवा स्मृतीदिन आहे. महाराष्ट्रातील (Maharashtra) अनेक नेते आणि कार्यकर्ते त्यांना अभिवादन करण्यासाठी गोपीनाथ गडावर दाखल झाले आहेत. त्याचवेळी गोपीनाथ मुंडे यांच्या समाधीचं दर्शन घेतल्यानंतर प्रीतम मुंडे (Pritham Munde) यांना अश्रू अनावर झाले. काही जुन्या आठवणी आठल्याने त्या भावूक झाल्याच्या पाहायला मिळाल्या. त्यावेळी तिथं राज्यभरातून आलेले अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. प्रीतम मुंडे दर्शन घेऊन बाहेर आल्यानंतर तिथं उपस्थित एक महिला रडत होती. त्यावेळी त्या महिलेला त्यांनी आधार देखील दिला आहे. त्याचबरोबर त्या महिला काय बोलत आहे हे देखील त्यांनी ऐकून घेतले.
एक महिला तिंथ रडत आली होती. तिचं प्रीतम मुंडे यांनी त्या महिलेची विचारपूर केली. त्यावेळी त्यांनी पतीचा मृत्यू झाल्याचं सांगितलं. तर पती एक छोड़ा व्यवसाय करीत होता, मृत्यू झाल्याने सगळं ढासळलं आहे. घरातल्या कुटुंबियांची माहिती घेतली. तसेच काळजी करून नका आपण त्याचं कायतरी करू असं देखील आश्वासन प्रीतम मुंडे यांनी महिलेला दिलं. आज राज्यात गोपीनाथ मुंडेच्या समाधीचं दर्शन घेण्यासाठी राज्यातून लोक आल्याने गोपीनाथ गडावर प्रचंड गर्दी आहे.
महविकास आघाडीचे नेते धनंजय मुंडे यांनी गोपीनाथ गडावर जाऊन गोपीनाथ मुंडे यांच्या समाधीचं दर्शन घेतलं. त्यावेळी त्यांनी तिथं उपस्थित अनेक कार्यकर्त्यांशी चर्चा देखील केली. गोपीनाथ मुंडे यांनी कामगारांसाठी खूप मोठं काम केलं. त्यांच्या संघर्षाचा आवाज आजही माझ्या कानात घुमतोय अशी प्रतिक्रिया त्यांनी मीडियाला दिली. तसेच मी त्यांच्यासोबत खूप वर्षे राहिलो आहे, त्यामुळं त्यांचं स्वप्न पुर्ण करण्याचं काम करतोय. कामगारांसाठी तयार केलेलं महामंडळं पिढ्यानंपिढ्या चालावं अशी माझी इच्छा आहे. महाविकास आघाडीच्या माध्यामातून मी एक प्रयत्न केला आहे. त्यांच्यासोबत अनेकवर्षे राहिल्यानंतर त्यांची स्वप्न मला माहित आहेत. मागच्या सहा-पाच वर्षात ज्या राजकीय घटना घडल्या, त्या मुंडे साहेब असते तर घडल्या नसत्या.
जीवनातली पहिली निवडणूक त्यांनी ज्या पध्दतीने लढवली ती सुद्धा माझ्या चांगली लक्षात आहे अशी आठवण त्यांनी याप्रसंगी सांगितली.