मुंबई: काँग्रेस शिवसेनेला पाठिंबा देणार (Prithviraj Chavan alliance with Shivsena) की नाही याविषयीची स्थित लवकरच स्पष्ट होणार आहे. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी शिवसेनेला पाठिंबा देण्यासाठीची चर्चा पुढे नेण्यासाठी हिरवा कंदिल दाखवला आहे. त्यानंतर आता काँग्रेसने शिवसेनेशी औपचारिक चर्चा सुरू केली आहे. सोनिया गांधींनी घेतलेल्या या निर्णयाविषयी माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी (Prithviraj Chavan alliance with Shivsena) सविस्तर माहिती दिली आहे.
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, “शिवसेनेला पाठिंबा देण्याच्या दृष्टीकोनातून चर्चा करण्यासाठी सोनिया गांधींनी हिरवा कंदील दाखवला आहे. यानंतर शिवसेनेशी औपचारिक चर्चा सुरू झाली. शिवसेनेला पाठिंबा देण्याचा विषय आला, तेव्हा सोनिया गांधींनी यावर व्यापक चर्चा केली. मात्र, तेव्हा शिवसेना एनडीएचा घटक होता, त्यामुळे चर्चा करणे शक्य नव्हते. शिवसेना एनडीएमधून बाहेर पडल्यानंतर याबाबत गांभीर्याने चर्चा सुरू झाली.”
आम्ही काँग्रेस आमदारांशी चर्चा करुन त्याची माहितीी सोनिया गांधींना दिला. त्यानंतर सोनिया गांधींनी आम्हाला दिल्लीत बोलवलं आणि चर्चा केली. त्यावेळी आम्ही आमची मतं मांडली. सोनिया गांधींनी फोनवरही चर्चा केली. पवारांनीही उद्धव ठाकरे याच्याशी औपचारिक चर्चा केली. मात्र, शिवसेनेला पाठिंब्याचं पत्र द्यायला तोपर्यंत उशीर झाला होता. शरद पवारांनीही आधी सर्व चर्चा करू आणि पुढे जाऊ, असं म्हटलं होतं. त्यांनी सोनिया गांधी यांनाही हाच सल्ला दिला. त्यानंतर आम्हीही पुढे कसं जायचं हे आधी चर्चा करून ठरवण्याचा निर्णय घेतला, असंही पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितलं.
आधी सरकारमध्ये जायचं आणि नंतर चर्चा करायची हे शक्य नव्हतं. त्यामुळे काँग्रेसने ढिसाळपणा दाखवला किंवा वेळ काढला, अशी टीका योग्य नसल्याचंही चव्हाण यांनी स्पष्ट केलं.
महासेनाआघाडीचा ‘किमान समान कार्यक्रम’ काय असणार?
शिवसेनेसोबत सत्तास्थापन करताना महासेनाघाडीचं किमान समान कार्यक्रम काय असणार याबाबतही पृथ्वीराज चव्हाण यांनी भाष्य केलं. ते म्हणाले, “काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीचा संयुक्त जाहीरनामा आणि शिवसेनेचा वचननामा घेऊन त्यातील कोणते मुद्दे घ्यायचे आणि कोणते मुद्दे वगळायचे हे ठरवले जाईन. किमान समान कार्यक्रम तयार करताना वादग्रस्त मुद्यांचे काय करायचं हेही या चर्चेत ठरावावं लागणार आहे. पहिल्यांदा किमान समान कार्यक्रमाबाबत चर्चा करावी लागेल. त्यासाठी आधी याबाबत आमच्या पक्षात चर्चा करू. त्यानंतर राष्ट्रवादीशी चर्चा करू. त्यानंतर सत्ता वाटप सूत्र आणि शिवसेनेला पाठिंबा याबाबत चर्चा होईन.”
मुख्यमंत्रिपदाविषयी विचारणा केली असता पृथ्वीराज चव्हाण यांनी याविषयी बोलणे टाळले. ते म्हणाले, “मुख्यमंत्रिपदाबाबत मी काहीही बोलणार नाही. सत्ता वाटपाच्या सूत्रात यावर चर्चेत निर्णय होईन.” शिवसेना आणि आमचं जुळू नये याचा भाजप प्रयत्न करत असल्याचंही त्यांनी नमूद केलं.