मुंबई : काँग्रेसच्या दोन बड्या नेत्यांनी ठाकरे सरकारला घरचा आहेर दिला. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि माजी खासदार संजय निरुपम यांनी ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारवर टीका केली. त्यातच निरुपम यांनी चव्हाणांनाच लक्ष्य केल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. (Prithviraj Chavan Sanjay Nirupam Criticises State Government)
कोरोनाचा सामना करताना सध्याच्या नेतृत्वाकडे प्रशासकीय कौशल्याचा अभाव असल्याची टीका पृथ्वीराज चव्हाणांनी केली. परप्रांतीय मजुरांच्या प्रवासाचा विषय आणि मुंबईत कोरोनामुळे उद्भवलेली परिस्थिती योग्यरित्या हाताळण्याची गरज चव्हाण यांनी व्यक्त केली.
“मुंबईत ‘कोरोना’चा कहर पाहायला मळत आहे. गेल्या 24 तासात 47 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. सध्या दर तासाला दोन मुंबईकर मृत्युमुखी पडत आहेत. आज (16 मे) 884 पॉझिटिव्ह रुग्ण आले आहेत. म्हणजे प्रत्येक तासाला 37 नवीन रुग्ण. या अपयशाची जबाबदारी कोणी घेईल का? कुणाला तरी बलिदान द्यावे लागेल? मंत्री की बाबू?” असं ट्वीट संजय निरुपम यांनी काल रात्री केलं होतं.
मुंबई में #COVID19 के केसेज लगातार उफान पर हैं।
पिछले 24 घंटे में 47 लोगों की जान गई है।औसतन हर घंटे दो मुंबईकर दम तोड़ रहे हैं।
आज 884 पॉज़िटिव केसेज मिले हैं।
यानि हर घंटे 37 नए मरीज।
कोई तो इस नाकामयाबी की जवाबदारी लेगा ?
किसी की तो कुर्बानी लेनी पड़ेगी ?
मंत्री या बाबू ?— Sanjay Nirupam (@sanjaynirupam) May 16, 2020
पृथ्वीराज चव्हाणांनी केलेली टीका ऐकून संजय निरुपम यांनी रविवारी पुन्हा ट्वीट करत पृथ्वीबाबांवर निशाणा साधला. “कॉंग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण म्हणाले आहेत की कोविड19 च्या संकटाला तोंड देण्यासाठी शिवसेनेच्या नेतृत्वाखालील राज्य सरकार अपयशी ठरली आहे. या अपयशाला कोण जबाबदार आहे, हे त्यांनी सांगितले नाही. हे तेच चव्हाण साहेब आहेत, ज्यांनी शिवसेनेबरोबर सरकार स्थापनेचा सुवर्ण विचार मांडला होता” अशी तोंडभर टीका संजय निरुपम यांनी केली.
कॉंग्रेस नेता पृथ्वीराज चव्हाण ने कहा है कि शिवसेना की अगुवाई वाली राज्य सरकार #Covid19 के संकट से निपटने में फेल हो गई है।
उन्होंने ये नहीं कहा कि इस असफलता की ज़िम्मेदारी किसकी है?
ये वही चव्हाण साहब हैं जिन्होंने शिवसेना के साथ सरकार बनाने का सुवर्ण विचार शुरू में दिया था।— Sanjay Nirupam (@sanjaynirupam) May 17, 2020
हेही वाचा : पृथ्वीबाबांनी मंदिराच्या सोन्याची काळजी करु नये, मोदींच्या नेतृत्वात सुवर्णयुग नक्कीच येणार : विखे पाटील