मुंबई : मला मुंबईकरांसाठी काम करण्याची इच्छा असल्याचे सांगत काँग्रेसच्या राष्ट्रीय प्रवक्त्या प्रियांका चतुर्वेदी यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला. नुकत्याच मातोश्रीवर झालेल्या पत्रकार परिषदेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि अन्य काही प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी शिवबंधन बाधून प्रियांका यांनी शिवसेनेत प्रवेश केला.
काँग्रेसच्या राष्ट्रीय प्रवक्त्या प्रियांका चतुर्वेदी (Priyanka Chaturvedi) यांनी आपला राजीनामा काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्याकडे पाठवला. प्रियांका चतुर्वेदी यांनी काँग्रेसमध्ये गुंडांना स्थान मिळत असल्याचा आरोप केला होता. त्यानंतर त्यांनी आज राजीनामा दिला.
प्रियांका यांनी “मी यापुढे शिवसेनेच्या प्रसारासाठी काम करणार असल्याची घोषणा केली. मला मुंबईकरांसाठी काहीतरी करण्याची इच्छा होती. त्या उद्देशाने मी नुकतीच एक संघटना सुरु केली आहे. याच प्रकारची संघटना मला अजून 10 ठिकाणी उभारायची होती”.
या पत्रकार परिषदेत तुम्ही काँग्रेस का सोडले असा प्रश्न काही पत्रकारांनी उपस्थित केला होता. त्यावेळी प्रियांका यांनी गेल्या दहा वर्षांपासून मी काँग्रेसमध्ये कोणत्याही स्वार्थाशिवाय काम करत होते. मात्र काँग्रेसने माझ्या भावना दुखावल्या. त्यामुळे मी काँग्रेस सोडण्याचा विचार केला. तसेच लोकसभेसाठी निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची माझी इच्छा नव्हती असे त्यांनी यावेळी सांगितले. माझ्या या निर्णयावर अनेकजण प्रश्न उपस्थित करणार आहेत याची मला कल्पना आहे, असेही प्रियांका यांनी सांगितले.
.@INCIndia च्या राष्ट्रीय प्रवक्त्या सौ. @priyankac19 जी यांनी आज मातोश्री येथे शिवसेना पक्षप्रमुख मा. श्री. उद्धव साहेब ठाकरे यांचा आशीर्वाद घेऊन शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. pic.twitter.com/H6L9amvDCq
— ShivSena – शिवसेना (@ShivSena) April 19, 2019
मला मुंबईकरांसाठी काम करायचे आहे. तसेच मला महिलांचा मुद्दा घेऊन आवाज उठवायचा आहे. मी महिला सशक्तीकरण करण्याचा प्रयत्न करेन. त्या दृष्टीकोनातून मी विचार करुन शिवसेनेत प्रवेश घेतला. देशात शिवसेना मजबूत करण्यासाठी काम करणार असल्याचे प्रियांका यांनी सांगितले.
उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया
मला अभिमान आहे की त्यांना शिवसेना पक्ष हा मजबुत वाटला आणि त्यांनी शिवसेनेत येण्याचा निर्णय घेतला असे उद्धव ठाकरे प्रियांका चतुर्वेदी यांच्या पक्ष प्रवेशावेळी म्हणाले. तसेच मताशी एकनिष्ठ राहिलेली एक बहिणी शिवसैनिकांना प्रियांका यांच्या रुपाने मिळाली. प्रियांका यांनी पक्षात प्रवेश केल्याने त्यांच्या बुद्धीमत्तेचा देशाला फायदा होईल अशी जबाबदारी त्यांच्यावर सोपवू असेही उद्धव यावेळी म्हणाले. तसेच त्या शिवसेनेत नक्की कोणत्या पदावर काम करणार याबाबत येत्या काही दिवसात तुम्हाला कळेलच.
या पत्रकार परिषदेत युवासेना नेते आदित्य ठाकरे यांनी प्रियांका यांच्या हातात शिवबंधन बांधले. शिवबंधन बांधल्यानंतर प्रियांका यांनी मुंबईची गर्जना शिवसेना, महाराष्ट्राची गर्जना शिवसेना अशी चक्क मराठी भाषेतून घोषणा केली.
संबंधित बातम्या :
काँग्रेसला झटका, प्रियांका चतुर्वेदी ‘मातोश्री’वर, आज शिवसेनेत प्रवेश