बारामती : यंदाच्या मौसमातील पहिल्या पावसाने मुंबईत ठिकठिकाणी पाणी साचलं. त्यामुळे अनेक ठिकाणची वाहतूक खोळंबली. या सगळ्याचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोस्टल रोड आणि मिलन सबवे परिसरात भेट देत आढावा घेतला. त्यावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाष्य केलं आहे. त्यांनी एकनाथ शिंदे यांना टोला लगावला आहे. पहिल्याच पावसात मुंबईत ठिकठिकाणी पाणी साचलं याबाबत प्रश्न विचारला असता, कुठं गटार तुंबलं, कुठं काय झालं याची मी माहिती घेत नसतो, असं म्हणत शरद पवार यांनी एकनाथ शिंदे यांना टोला लगावला आहे.
#मुंबई तील #वरळी येथील कोस्टल रोड येथे हजर राहून पाणी साचण्याची कारणे जाणून घेतली. तसेच येथील परिस्थितीचा आढावा घेतला. या भागात पाणी साचू नये याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश दिले. आज जरी याठिकाणी पाणी नसले तरीही काल मुंबईत झालेल्या पहिल्याच पावसामुळे इथे पाणी साचून हा परिसर… pic.twitter.com/LKhy1LWRML
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) June 25, 2023
आज सकाळी #मुंबई उपनगरातील #मिलन_सबवे ला अचानक भेट देऊन पाहणी केली. सध्या या भागात पाणी साचलेले नाही, पावसाचे साठलेले पाणी टॅंकरमध्ये जमा करण्यासाठी स्टोरेज टॅंक ठेवलेल्या आहेत. या भागात पाणी साचणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचनाही यावेळी महापालिका अधिकाऱ्यांना दिल्या.#Mumbai… pic.twitter.com/u60VyhGKUd
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) June 25, 2023
BRS पक्ष राज्याच्या राजकारणात सक्रीय होत आहे. त्यावर त्यांच्याकडे साधन संपत्ती आहे, याची चिंता नाही. त्यामुळे त्यांनी काय करावं हा त्यांचा अधिकार आहे. त्यांना जर सेवा करायची असेल तर त्यांच्या स्वागत आहे. ते काय करत आहेत, लोक त्याला कसा प्रतिसाद देतील हे निवडणुकीनंतर दिसून येईलच, असं पवार म्हणाले.
बिहारचे मुख्यमंत्री नीतीश कुमार यांनी पटनामध्ये देशातील प्रमुख विरोधी पक्षांची बैठक बोलावली होती. त्यावर शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
आम्हा सगळ्या विरोधी पक्षांची बैठक झाली. यामध्ये कुठेही पंतप्रधानपदाची चर्चा झालेली नाही. या बैठकीमध्ये चर्चा ही महागाई आणि बेकारीच्या प्रश्नावर चर्चा झाली. काही ठिकाणी सांप्रदायिक शक्ती वाढवण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला जातोय आणि समाज समाजामध्ये अंतर निर्माण पाडलं जात आहे. यामुळे कोणत्याही राज्यामध्ये समाज विभाग प्रवृत्ती वाढत असतील तर यासाठी सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे, अशी चर्चा विरोधी पक्षाच्या बैठकीत झाली, असं शरद पवार यांनी सांगितलं.
सिद्धरामय्या यांनी जे कर्नाटकमधील महिलांसाठी ज्या योजना राबवल्या आहेत, या योजनांची अंमलबजावणी इथेही करावी असं त्यांनी सांगितलं आहे, असं शरद पवार म्हणालेत.
गेल्या पाच सहा दिवसांपूर्वीची स्थिती आणि आजची स्थिती यामध्ये फरक आहे. चार-पाच दिवसांपूर्वी अतिशय चिंतेचे वातावरण राज्यात होतं गेल्या दोन दिवसात हवामानात बदल दिसतोय त्यामुळे कुठे ना कुठेतरी पावसाची सुरुवात झाली आहे. हवामान खात्याचे आव्हान आहे चार ते पाच दिवसाचे शेतीसाठी हे वातावरण पोषक आहे हवामान खात्याचा गेले अनेक वर्षाचा अनुभव आहे, असं म्हणत शरद पवार यांनी म्हटलं आहे.