पुणे : अजित पवार यांनी बंड केल्याने राष्ट्रवादी पक्षात उभी फूट पडली आहे. एकाच पक्षातील नेते आणि कार्यकर्ते आता दोन गटात विभागले गेले आहेत. पुणे राष्ट्रवादीतही दोन गट पडले आहेत.एक वर्ग अजित पवार यांच्या भूमिकेचं समर्थन करत आहेत. तर काहीजण शरद पवार यांच्याच पाठीशी ठामपणे उभे आहेत. त्यामुळे पुणे शहर राष्ट्रवादीतही दोन गट पडले आहेत.
पुणे शहरात देखील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली आहे. अजित पवार यांनी मुंबईत बोलावलेल्या बैठकीत पुण्यातील राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांची संख्या अधिक होती.
खासदार वंदना चव्हाण, आमदार चेतन तुपे, शहराध्यक्ष प्रशांत जगताप, प्रवक्ते अंकुश काकडे,दीपाली धुमाळ,काका चव्हाण, सायली वांजळे, कमल ढोले पाटील, मृणालिनी वाणी, महेश हांडे, बाळासाहेब रायकर , शरद डबडे, कुणाल पोकळे, सुरेखा धनिष्ठे, गणेश नलावडे, किशोर कांबळे, विक्रम जाधव यांच्यासह इतर नेते हे शरद पवार यांच्यासोबत आहेत.
अजित पवार यांच्या गटात आमदार सुनील टिंगरे, राजलक्ष्मी भोसले, दीपक मानकर, बाबूराव चांदेरे, सुभाष जगताप, युवराज बेलदरे, प्रकाश कदम, महेंद्र पठारे, प्रमोद निम्हण, आनंद आलकुंटे, दत्ता धनकवडे, बाळासाहेब बोडके, विनोद आरसे, अनिस सुंडके, प्रशांत म्हस्के, शंकर केमसे, रोहिणी चिमटे, सुनीता मोरे, सदानंद शेट्टी, विकास दांगट, बाबा धुमाळ, गणेश घुले आणि इतर नेते आहेत.
पुणे जिल्हा हा राष्ट्रवादी पक्षाचा बालेकिल्ला आहे. अशात आता पक्षात दोन गट पडले आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीतील नेते आणि विशेषत: कार्यकर्ते संभ्रमात आहेत.
पुण्यात आता राष्ट्रवादीत दोन गट पडले आहेत. मात्र आता समोर येऊन भूमिका मांडण्यास पदाधिकारी, कार्यकर्ते नकार देत आहेत.
दुसरीकडे राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाकडून पुणे शहराध्यक्ष पदासाठी नेत्यांच्या चाचपणी सुरू आहे. अजित पवार गटाकडून पुणे राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्षपदी दिपक मानकर यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे. दिपक मानकर यांच्या नावाची आज दुपारी अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. तर महिला शहराध्यक्षपदी रूपाली ठोंबरे यांची वर्णी लागण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे.
अजित पवार गटाकडून पुण्यात शहर कार्यालयाची शोधा शोध सुरू आहे. पुणे शहर कार्यालयावर अजित पवार गट दावा करणार नाही, अशीही माहिती आहे.