पुणे : आगामी महापालिका आणि विधानसभा निवडणुकांची लिटमस टेस्ट म्हणून कसबा (Kasba Peth) आणि चिंचवड (Chinchwad) विधानसभा पोट निवडणुकांकडे पाहिलं जातंय. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर पहिल्यांदाच एवढ्या ताकतीनं निवडणुकीचा आखाडा गाजवला गेला. भाजपने मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह भाजपाच्याही दिग्गजांना प्रचारसभांमध्ये उतरवलं. निवडणुकीची रणनीती आखण्यापासून पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, राज्याचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे अन् ऐन मतदानाच्या आधीपर्यंत शिंदे,फडणवीस सगळेच उमेदवार हेमंत रासने यांच्यासाठी मैदानात उतरले होते. निवडणुकीआधी भाजपने केलेल्या सर्वेक्षणांतून जे चित्र दिसून आलं, तेच घडेल की काय अशी भीती होती. त्यामुळे सगळ्याच बाजूंनी जोर लावण्यात आला. मात्र कसब्यात काँग्रेसचा विजय झाला. रवींद्र धंगेकर ११ हजार ४० मतांनी विजयी झाले. विधान परिषद निवडणुकांनंतरचा भाजपाला बसलेला हा दुसरा धक्का आहे. केंद्रात, राज्यात सत्तेत असले तरी भाजपाला थेट मुळापर्यंत जाऊन पराभवाची कारणं शोधावीच लागतील. कसब्यात भाजपाला हार का पत्करावी लागली, याच्या कारणांपैकी प्रमुख
काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर हे पूर्वाश्रमीचे मनसे कार्यकर्ते आहेत. त्यामुळे मनसेने त्यांना आतून मदत केल्याचं म्हटलं जातंय. पुण्यात एकनाथ शिंदे गटाचा फार प्रभाव नसल्याने भाजपाला एकट्याच्या ताकतीवर हा गड शाबूत ठेवायचा होता. तर सध्या काँग्रेसमध्ये असूनही रवींद्र धंगेकर हे राज ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू मानले जातात. मनसेने धंगेकर यांना छुपा पाठिंबा दिल्यानेच भाजपची मतं कमी झालं, असंही एक प्रमुख कारण सांगितलं जातंय.