PMC Election 2022 Ward 57 : राष्ट्रवादी काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात भाजप आव्हान देणार का? जाणून घ्या या वॉर्डची राजकीय सद्यस्थिती

| Updated on: Jul 26, 2022 | 1:06 AM

वॉर्ड क्रमांक 57 हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला असला तरी येथे राष्ट्रवादी काँग्रेसबरोबरच इतर प्रमुख पक्षांकडून निवडणूक लढवण्यास अनेक उमेदवार इच्छुक आहेत.

PMC Election 2022 Ward 57 : राष्ट्रवादी काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात भाजप आव्हान देणार का? जाणून घ्या या वॉर्डची राजकीय सद्यस्थिती
पुणे महापालिका निवडणूक
Image Credit source: TV9
Follow us on

पुणे : महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांकडे संपूर्ण देशाच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागलेले आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या राजकारणाची दिशा या निवडणुकीमुळे ठरणार आहे. राज्यातील ज्या शहरांच्या निवडणुकांकडे संपूर्ण राज्यासह देशाचे लक्ष लागलेले असेल, त्यात मुंबईप्रमाणेच पुणे महापालिके (Pune Municipal Corporation)चा समावेश असेल. सध्या या महापालिकेच्या सत्तेच्या चाव्या भाजप (BJP)च्या हाती आहेत. येथील सत्ता आपल्याच हाती ठेवण्यासाठी भाजपचा निर्धार असेल. त्याचवेळी सध्या येथील सत्तेपासून दूर असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस (NCP)कडून येत्या निवडणुकीत पुणे महापालिकेची सत्ता मिळवण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरु करण्यात आले आहेत. ही सत्ता मिळविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी मुख्यमंत्री अजित पवार यांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे. त्याचवेळी भाजपचे बडे नेते रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे निश्चितच पुणे महापालिकेची निवडणूक कमालीची चुरशीची होणार आहे. पालिकेच्या वॉर्ड क्रमांक 57 मधील लढतदेखील राजकीय वर्तुळाचे लक्ष वेधून घेणार आहे.

पुणे महापालिका वॉर्ड 57 अ

पक्षउमेदवारविजयी उमेदवार
शिवसेना
भाजप
काँग्रेस
राष्ट्रवादी
मनसे
अपक्ष/इतर

वॉर्ड क्रमांक 57 ची लोकसंख्या

एकूण लोकसंख्या – 55643
अनुसूचित जाती – 5609
अनुसूचित जमाती – 523

पुणे महापालिका वॉर्ड 57 ब

पक्षउमेदवारविजयी उमेदवार
शिवसेना
भाजप
काँग्रेस
राष्ट्रवादी
मनसे
अपक्ष/इतर

सलग दहा वर्षे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांचा दबदबा

वॉर्ड क्रमांक 57 हा सुखसागर नगर – राजीव गांधी नगर या नावाने ओळखला जाणारा मतदारसंघ. नव्याने निर्मिती झालेल्या या वॉर्डमध्ये मोठ्या गृहनिर्माण सोसायट्या तसेच बैठी घरे आहेत. त्याचबरोबर कामगारवर्गाच्या चाळी देखील आहे. त्यामुळे हा वॉर्ड संमिश्र मतदारांचा वॉर्ड म्हणून परिचित आहे. या वॉर्डमध्ये मागील सलग दहा वर्षे राष्ट्रवादी काँग्रेसने आपला दबदबा राखला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी मोठ्या मताधिक्याने विजय मिळवून विरोधकांना चारीमुंड्या चीत केले आहे. केवळ मागील म्हणजेच 2017 च्या निवडणुकीत भाजपने एका जागेवर निसटता विजय मिळवला होता. भाजपने त्याद्वारे डोके वर काढल्यामुळे यंदाच्या निवडणुकीत भाजप पक्ष आणखी कोणती व्यूहरचना आखून राष्ट्रवादी काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात आपला ठसा उमटवतोय हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

हे सुद्धा वाचा

पुणे महापालिका वॉर्ड 57 क

पक्षउमेदवारविजयी उमेदवार
शिवसेना
भाजप
काँग्रेस
राष्ट्रवादी
मनसे
अपक्ष/इतर

निवडणूक लढवण्यास सर्वच प्रमुख पक्षांकडे अनेक इच्छुक उमेदवार

वॉर्ड क्रमांक 57 हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला असला तरी येथे राष्ट्रवादी काँग्रेसबरोबरच इतर प्रमुख पक्षांकडून निवडणूक लढवण्यास अनेक उमेदवार इच्छुक आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रकाश कदम, भारती कदम, प्रतीक कदम, सुधीर डावखर, ओंकार घाटे, गणेश मोहिते, उदयसिंह मुळीक हे निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. तसेच भाजपकडून मनिषा कदम, विनय कदम, नितीन राख, दिपक पालवे आदी उमेदवार इच्छुक आहेत. इतर पक्षांकडूनही दिग्गज उमेदवार रिंगणात उतरवण्याची जोरदार तयारी आहे. मात्र खरा सामना भाजप आणि राष्ट्रवादी काँगेस यांच्यात होण्याची दाट शक्यता जाणकारांकडून वर्तविली जात आहे.