कोल्हापूर : महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना दिलेल्या आव्हानानंतर, राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्या आक्रमक झाल्या आहेत. पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांनी थेट कोल्हापुरात धाव घेत, आंदोलन सुरु केलं.
दुष्काळाबाबतच्या चर्चेसाठी राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्या कोल्हापुरात दाखल झाल्या. ताराराणी पुतळ्याजवळ या महिलांनी आंदोलन करत, चंद्रकांत पाटील चौकात या, अशी घोषणाबाजी या महिलांनी सुरु केली.
‘जाणता राजा असो किंवा त्यांचा कोणी पंटर, आपण दुष्काळाबाबत भरचौकात चर्चा करायला तयार आहोत, असं खुलं आव्हान चंद्रकांत पाटील यांनी शरद पवारांना दिले होते. चंद्रकांत पाटील यांच्या या वक्तव्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली आहे.
चंद्रकांत पाटील म्हणाले, पवार किंवा पंटरांनी चौकात या, पुणे राष्ट्रवादीच्या महिला कोल्हापुरात दाखल!https://t.co/9y7m3RPL2W @vijaykesarkar pic.twitter.com/oci7ljJULD
— TV9 Marathi (@TV9Marathi) May 13, 2019
चंद्रकांत पाटील नेमकं काय म्हणाले?
सरकारने दुष्काळासंदर्भात जी कामं केली आहेत, त्यासंबधीची आकडेवारी मी सर्वांसमोर मांडतो. या आकडेवारीसंदर्भात कोणीही चौकात चर्चा करायला बोलवलं तरी मी तयार आहे. मग ते जाणता राजा असो किंवा कोणीही, असे म्हणत महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शरद पवारांना खुलं आव्हान दिलं. ते सोलापुरातल्या मोहोळ तालुक्यात दुष्काळ दौऱ्यात बोलत होते.
काही जण आपल्या राजकीय स्वार्थासाठी संभ्रम निर्माण करत आहेत. संभ्रम निर्माण करुन सामान्य माणसाला विचलित करण्याचा प्रयत्न केला जात आहे. दुष्काळी परिस्थितीत सामान्यांना उभारी द्यायची असते. मात्र काही जण सामान्यांना विचलित करतात, असे म्हणत चंद्रकांत पाटलांनी शरद पवार यांच्यावर टीका केली.
संबंधित बातम्या