2024 पर्यंत तरी शरद पवारांनी अध्यक्ष राहावं; ‘या’ नेत्याची इच्छा

| Updated on: May 04, 2023 | 4:56 PM

NCP Ankush kakade on Sharad Pawar : शरद पवारांच्या निवृत्तीमुळे राष्ट्रवादीत फूट? 'या' नेत्याने स्पष्टच सांगितलं...

2024 पर्यंत तरी शरद पवारांनी अध्यक्ष राहावं; या नेत्याची इच्छा
Follow us on

पुणे : शरद पवार यांनी राष्ट्रवादीचं अध्यक्षपद सोडत असल्याची घोषणा केली. त्यानंतर विविध प्रतिक्रिया येऊ लागल्य. शरद पवार हे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांच्या अनुभवाचा फायदा पक्षाला होतो. शरद पवार यांच्या नावाचं वलय आहे. त्यांच्या नावाचं वलय पाहून लोक राष्ट्रवादीला मतदान करतात. त्यामुळे शरद पवार यांनी अध्यक्षपद सोडू नये, अशी भावना राष्ट्रवादीच्या नेत्या आणि कार्यकर्त्यांकडून व्यक्त केली जात आहे. राष्ट्रवादीचे पुण्यातील नेते अंकुश काकडे यांनीही शरद पवार यांनी अध्यक्षपद सोडू नये, अशी भूमिका घेतली आहे.

शरद पवारांनी 2024 पर्यंत तरी राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदावर कायम राहावं. 10 जून 2025 ला राष्ट्रवादीचं अधिवेशन होणार आहे. तोपर्यंत शरद पवारांनी अध्यक्ष राहावं. शरद पवारच अध्यक्ष राहतील असा समितीने एकमताने ठराव करावा, असं काकडे म्हणाले. शरद पवारांच्या निवृत्तीमुळे राष्ट्रवादीत कुठलीही फूट पडली नाहीये, असंही अंकुश काकडे यांनी स्पष्ट केलं आहे.

शरद पवार अध्यक्षपदावरून पायउतार झाल्यानंतर राष्ट्रवादीचा नवा अध्यक्ष कोण असणार? याबाबत चर्चा होतेय. सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांच्या नावाची सध्या चर्चा होतेय. यातही सुप्रिया सुळे यांचं नाव आघाडीवर आहे.

सुप्रिया सुळे यांच्या नावाला राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली पाटील यांनी पसंती दर्शवली आहे. सुप्रिया सुळे सक्षम नेतृत्व आहे. जर त्यांना संधी मिळाली तर आम्ही स्वागतचं करू, असं रूपाली पाटील म्हणाल्या आहेत.

शरद पवारांनी असा निर्णय घेणं हे पचनी पडत नाही. राष्ट्रवादी म्हणजे शरद पवार आणि शरद पवार म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस! अजित पवार समजून सांगण्याचा प्रयत्न करतायेत. जर पवारसाहेबांच्या समोर राष्ट्रवादी आणखी बळकट झाली तर तुम्हाला चालणार नाही का? मात्र 2024 पर्यंत साहेबांनी नेतृत्व करावं, अशी आम्हा सर्वांची इच्छा आहे, असंही रूपाली पाटील म्हणाल्यात.

पवारांनी अध्यक्षपद स्वत:कडे ठेवावं म्हणून आंदोलन

शरद पवार यांनी राजीनामा दिल्यापासूनच राष्ट्रवादीचे नेते, कार्यकर्ते भावनिक साद घालण्याचा प्रयत्न करत आहेत. राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदी शरद पवार यांनी कायम राहावं, यासाठी आग्रह धरला जात आहे. आज युवक आणि युवती राष्ट्रवादीच्या वतीने आंदोलन करण्यात आलं. आधी सुप्रिया सुळे आणि नंतर खुद्द शरद पवार यांनीही या आंदोलनकर्त्या नेत्या आणि पदाधिकाऱ्यांचं मन वळवण्याचा प्रयत्न केला.