चंद्रकांत पाटील कलादालनात आले अन् अजित पवारांचं व्यंगचित्र शोधू लागले…; पाहा नेमकं काय घडलं?

| Updated on: May 07, 2023 | 5:38 PM

एकनाथ शिंदे बेडवर झोपलेत, फडणवीस त्यांना विचारतायेत, बघा कसं झोपवलं!; व्यंगचित्र प्रदर्शन पाहून चंद्रकांत पाटलांची राज्यातील राजकीय नेत्यांवर टोलेबाजी

चंद्रकांत पाटील कलादालनात आले अन् अजित पवारांचं व्यंगचित्र शोधू लागले...; पाहा नेमकं काय घडलं?
Follow us on

पुणे : पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरामध्ये व्यंगचित्र प्रदर्शन सुरू आहे. या पुणे आंतरराष्ट्रीय व्यंगचित्र महोत्सवाला पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी भेट दिली. यावेळी व्यंगचित्र प्रदर्शन पाहून चंद्रकांत पाटील यांनी राज्यातील राजकीय नेत्यांवर टोलेबाजी केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांना चंद्रकांत पाटलांनी टोला लगावला.

बालगंधर्व रंगमंदिराच्या कला दालनात येताच चंद्रकांत पाटील यांना अजित पवारांची आठवण आली. आत येताच अजित पवार यांचं व्यंगचित्र सुध्दा लावलं आहे का?, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

पुण्यात भरलेल्या आंतरराष्ट्रीय व्यंगचित्र प्रदर्शनाला भेट देत चंद्रकांत पाटील यांनी राजकीय नेत्यांवर व्यंगचित्रावरून टोलेबाजी केली आहे. एक व्यंगचित्र राजकीय नेत्यांना समाजातील त्यांचे स्थान दाखवून देतो आणि या प्रदर्शनात तर अनेक व्यंगचित्र अशी आहेत. त्या त्या नेत्यांना करेक्ट झोंबतील, असं विधान त्यांनी केलं.

व्यंगचित्र प्रदर्शन पाहताना चंद्रकांत पाटलांनी राजकीय व्यंगचित्र बघत राजकीय टोलेबाजी केलेली पहायला मिळाली. एक व्यंगचित्रात शरद पवार, आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे दिसत असून उद्धव ठाकरे शरद पवारांना विचारत आहेत की, माझं नेमकं काय चुकलं हे समजत नाही, असं म्हणत चंद्रकातं पाटील यांनी टोला लगावला.

एका व्यंगचित्रकार राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे एका बेडवर झोपलेले दिसत आहेत. त्यांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विचारत आहेत की, पाहा मी तुम्हाला बसवलंच नाही तर झोपवलं देखील!, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

विशेष म्हणजे हे व्यंगचित्र प्रदर्शन पाहताना चंद्रकांत पाटलांनी कलाकारांना सध्या तुम्हाला खूप राजकीय स्कोप आहे, असं बोलून ऑफरच दिली आहे.

व्यंगचित्र हा व्यवसाय नसून आवड आहे. मी खूप इंटरेस्ट घेऊन व्यंगचित्र पाहत होतो. व्यंगचित्र हे थोडक्यात समाजातलं न्यून दाखवतं. कोण कुणाला चिमटा काढला आहे हे पहायला मला आवडतं. नवीन शिक्षण धोरणात अनेक नविन कोर्स सुरू करण्याचा माझा प्रयत्न आहे. व्यंगचित्रासाठी देखील एखदा कोर्स सुरू करावा. यासाठी काहीही मदत लागली तर शासन म्हणून मी मदत करणार आहे, असं चंद्रकांत पाटील म्हणाले. व्यंगचित्रकारांना पाच वर्ष महाराष्ट्र सरकारकडून काही मानधन दिलं जावं. यासाठी प्रयत्न करणार आहे, असंही चंद्रकांत पाटील म्हणाले.