अभिजीत पोते, प्रतिनिधी- टीव्ही 9 मराठी, पुणे | 19 ऑक्टोबर 2023 : माजी पोलीस अधिकारी मीरा बोरवणकर यांचं मॅडम कमिशनर हे पुस्तक प्रकाशित झालं आहे. यात त्यांनी अजित पवार यांच्यावर जमीन हस्तांतरण प्रकरणावरून काही आरोप केलेत. त्यावेळी राज्यात आघाडीचं सरकार होतं आणि मुख्यमंत्री होते काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण. या सगळ्या प्रकरणावर तत्कालिन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सविस्तर प्रतिक्रिया दिली आहे. मीरा बोरवणकर यांनी मागितलेली पोस्टीग त्यांनी जमीन हस्तांतरणला विरोध केल्याने मिळाले नसल्याचा पुस्तकात उल्लेख आहे. पण तसं काही नाही. त्यावेळी त्यांना हवी ती पोस्ट नव्हती. त्यामुळे त्याचा गैरसमज झाला असावा. मला त्यात जास्त माहिती नाही. पण वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदलीमध्ये खूप मोठी प्रकिया असते.त्यामुळे त्यांचा माझ्याबद्दल गैरसमज झाला असेल, असं पृथ्वीराज चव्हाण म्हणालेत.
राज्य आणि केंद्र अंदाजपत्रक होतं. तेव्हा निधी वाटप केला जातो. त्याप्रमाणे निधी वाटप होतो काम होतात. अनेक वेळा ग्रामीण भागात दिला जातो निधी, आमदार खासदार यांना दिला जातो,तोंड बघून निधी दिला जातो हे दुर्दैवी आहे. त्यातून आता कोर्ट कचेरी सुरू आहे. जनतेसमोर जाईल तेव्हा जनता उत्तर देईल. केंद्राचा भेदभाव सुरूच आहे. उपाय एकच आहे. सरकार घालवल पाहिजे मग निधी वाटप होईल, जो कोणी सोबत येणार नाही त्यांना निधी नाही, असंही पृथ्वीराज चव्हाण म्हणालेत.
मी मुख्यमंत्री असताना मराठा आरक्षणासाठी पहिल पाऊल उचलले होतं. पण आरक्षणसाठी गायकवाड आयोग वेळी योग्य टक्केवारी निघाली नाही. सध्याच्या शिंदे-फडणवीस सरकारने वेळ मागितला आहे. आपण पाहू काय होतं ते येणाऱ्या काळात कळेलच, असं म्हणत पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं आहे.
शिवसेना आणि राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणावर पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पक्षांतर्गत बंदी कायदा कुचकामी ठरला आहे. दुर्भाग्य पूर्ण घटना आहे अजून निर्णय दिला जात नाही,सुप्रीम कोर्ट हतबल झालं आहे. विधानसभा अध्यक्ष यांनी न्याय निवडा करावा लागतो. सुप्रीम कोर्टने काही ठोस निर्णय घेतला पाहिजे. विधानसभा अध्यक्ष एका पक्षाचा आहे त्यामुळे ते करतील लवकर असं वाटत नाही, असं पृथ्वीराज चव्हाण म्हणालेत.