जयंत पाटील यांची ईडी चौकशी झाली, यात कमीपणा नाही कारण…- शरद पवार

| Updated on: May 23, 2023 | 9:46 AM

Sharad Pawar on Jayant Patil ED : जयंत पाटील यांची ईडी चौकशी अन् नवाब मलिक यांची भूमिका; शरद पवार यांचं भाजपवर टीकास्त्र

जयंत पाटील यांची ईडी चौकशी झाली, यात कमीपणा नाही कारण...- शरद पवार
Follow us on

पुणे : आयएल अँड एफएस प्रकरणी जयंत पाटील यांची पडताळणी सुरू आहे. आयएल अँड एफएस कंपनीमध्ये आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आहे. या प्रकरणी जयंत पाटील यांची काल साडे नऊ तास चौकशी झाली. यावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “जयंत पाटील यांच्या चौकशीबद्दल पूर्ण माहिती माझाकडे नाही. पण महाराष्ट्रात चांगले काम करणारे प्रशासक असं जयंत पाटील यांचं व्यक्तिमत्व आहे. आज त्यांना कशासाठी बोलावलं याची कमीपणा नाही. ईडी सारख्या तपास यंत्रणांचा गैरवापर कसा होतो याच हे उदाहरण आहे”, असं शरद पवार म्हणालेत.

ईडीने ज्या लोकांची चौकशी केली त्याची आमचाकडे जी यादी आहे. त्यानुसार राष्ट्रवादीचा महत्वाच्या 10 लोकांना बोलावलं गेलं. काही लोकांवर अॅक्शन झाली. अनिल देशमुख यांनी 100 कोटी घेतल्याचा आरोप करण्यात आला. जो आरोप पत्र दाखल केलं. त्यात ती रक्कम 20 कोटी वर आली. त्यामुळे अतिरंजित आरोप केले जातात. लोकांना धक्का बसला. बदनामी करण्याचं काम केलं. आणि आता सांगता रक्कम तितकी नाही. त्यांचा शैक्षणिक संस्थेला देणगी दिलेली आहे, असं शरद पवार म्हणालेत.

नवाब मलिक यांनीही त्रास दिला गेला. ते जी भूमिका मांडत होते, त्याची किंमत त्यांना मोजावी लागली. पण किंमत मोजताना ज्यांचाविरोधात कारवाई केली गेली. त्याच्याबाबत आता स्पष्टता येत आहे. त्यामुळे नवाब मलिक सत्य बोलत होते हे आता दिसत आहे, असं शरद पवार म्हणालेत.

राष्ट्रवादीच्या 9-10 लोकांना या ना त्या पद्धतीने त्रास देण्यात आला आहे. सत्ताधाऱ्यांच्या काही अपेक्षा असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यांचा अपेक्षा पूर्त करण्याची आमची तयारी नाही. काय यातना होतील ते सहन करू, असं शरद पवार म्हणालेत.

ठाण्यात किती केस झाल्या, या सगळ्याच्या खोलात गेल्यानंतर बाहेर येतं. चुकीचं काम करणाऱ्यांना संरक्षण आणि चांगल्या लोकांना त्रास हे आत्ताच्या सरकारचं धोरण आहे, असंही ते म्हणालेत.

दोन हजाराची नोट बँकेत जमा करण्याचे आदेश रिजर्व्ह बँकेने दिले आहेत. त्यावर पवार बोललेत. लहरी माणसाने निर्णय घ्यावे तसे निर्णय घेतले जात आहेत. पीडीसीसीमध्ये रक्कम बदलून द्यायची जबाबदारी असताना दिली नाही. पुणे जिल्हा बँकेचं त्यामुळे आर्थिक नुकसान झालंय. देशात चमत्कार होईल सांगितल गेलं . चमत्कार इतकचं झालं की काही लोकांनी आत्महत्या केल्या, असंही शरद पवार म्हणालेत.