उदयनराजेंना पुन्हा राष्ट्रवादीत घेणार का?; शरद पवारांनी असा षटकार मारला की, सभागृहात हशा पिकला

| Updated on: Dec 03, 2023 | 4:22 PM

Sharad Pawar on Udayanraje Bhonsle : उदयनराजेंना पुन्हा राष्ट्रवादीत घेणार का?... पत्रकारांनी थेट प्रश्न विचारला. शरद पवार यांनी असा षटकार मारला की, सभागृहात हास्याचे फवारे उडाले. शरद पवार नेमकं काय म्हणाले? 2019 ला साताऱ्यात नेमकं काय झालं? साताऱ्याचा राजकीय इतिहास काय? वाचा....

उदयनराजेंना पुन्हा राष्ट्रवादीत घेणार का?; शरद पवारांनी असा षटकार मारला की, सभागृहात हशा पिकला
Follow us on

योगेश बोरसे, प्रतिनिधी- टीव्ही 9 मराठी, पुणे | 03 डिसेंबर 2023 : उदयनराजे भोसले यांना पुन्हा राष्ट्रवादी पक्षात घेणार का? असा प्रश्न पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना विचारण्यात आला. तेव्हा त्यांनी तुमच्याकडे काही माहिती दिली आहे का? असा प्रतिप्रश्न शरद पवार यांनी केला. उदयनराजे यांचं भाजपमध्ये मन लागत नाही, म्हणून विचारलं की तुमच्याशी त्यांची पुन्हा जवळीक झाली आहे का? असं विचारलं. तेव्हा मन लागत नाही. तर कुठे कुठे मन लागत नाही, याची खासगीत माहिती मला द्या…असं शरद पवार म्हणाले. त्यानंतर शरद पवार स्वत: देखील खलखळून हसले आणि उपस्थितांमध्येही हास्याचा फवारा उडाला. पत्रकार परिषद सुरु असलेल्या सभागृहात एकच हशा पिकला.

2019 ची निवडणूक

सप्टेंबर 2019… लोकसभेची निवडणूक झाली होती. या लोकसभा निवडणुकीत उदयनराजे भोसले हे साताऱ्यात्या जागेवर निवडून आले होते. मात्र पुढे तीन चार महिन्यात उदयनराजे यांनी आपल्या खासदारकीचा राजीनामा दिली आणि त्यांनी शरद पवार यांची साथ सोडत भाजपसोबत जाणं पसंत केलं. पुढे पोटनिवडणूक लागली. या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीचे उमेदवार आणि शरद पवार यांचे निकटवर्तीय श्रीनिवास पाटील यांनी उदयनराजे यांचा दारूण पराभव केला.

शरद पवारांची पावसातली सभा

शरद पवार यांनी साताऱ्यात सभा घेतली. ही सभा सुरु असतानाच पाऊस आला. पण या पावसामुळे शरद पवार थांबले नाहीत. शरद पवार यांच्या साताऱ्याच्या या सभेची तेव्हा भरपूर चर्चा झाली. त्यावेळी श्रीनिवास पाटील यांचा दणदणीत विजय झाला. साताऱ्यात मोठं प्रस्थ असतानाही उदयनराजे यांना पराभवाची धूळ चाखावी लागली. त्यावेळी उदयनराजे यांच्या या पराभवाची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा झाली.

आता हे सगळं आठवण्याचं कारण म्हणजे, उदयनराजे यांना परत राष्ट्रवादी पक्षात घेणार का? असा प्रश्न शरद पवार यांना विचारण्यात आला. तेव्हा पवारांनी त्यावर मिश्किल टिपण्णी केली. याची सध्या जोरदार चर्चा होत आहे.