पुणे : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या गटातील आमदार उदय सामंत (Uday Samant) यांच्या गाडीवर पुण्यात (PUNE) मंगळवारी हल्ला झाल्याची घटना घडली होती. कात्रज परिसरात हा हल्ला झाला होता. या हल्ल्यामध्ये उदय सामंत यांच्या गाडीची काच फुटली. विशेष म्हणजे मंगळवारीच युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांची देखील कात्रजमध्ये सभा होती. आता उदय सामंत हल्ल्याप्रकरणात पुण्याचे शिवसेना शहर प्रमुख संजय मोरे यांच्यासह पाच जणांना अटक करण्यात आली आहे. पुणे पोलिसांनी संजय मोरे यांना मंगळवारी रात्री उशिरा अटक केली. दरम्यान या प्रकरणात आणखी काही लोकांना अटक होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. हा हल्ला शिवसैनिंकाकडून करण्यात आल्याचे बोलले जात आहे. या हल्ल्याची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील दखल घेतली आहे. दगड मारून पळून जाणं ही मर्दुमकी नाही. हल्लेखोरांवर कठोर कारवाई करणार असल्याचा इशारा एकनाथ शिंदे यांनी दिला आहे.
मंगळवारी उदय सामंत यांच्या वाहनावर कात्रज परिसरात हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात उदय सामंत यांच्या वहानाची मागची काच फुटली. विशेष म्हणजे मंगळवारी शिवसेना नेते आणि युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांची देखील कात्रजमध्ये सभा होती. या सभेला शिवसैनिकांनी गर्दी केली होती. त्यामुळे हा हल्ला शिवसैनिकांनी केल्याचे बोलले जात आहे. आता या प्रकरणात पुणे पोलिसांनी काल रात्री उशिरा शिवसेनेचे पुणे शहर प्रमुख संजय मोरे यांच्यासह पाच जणांना अटक केली आहे. या प्रकरणात आणखी काही जणांना अटक होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
दरम्यान या हल्ल्यानंतर आता शिंदे गटातील आमदारांकडून तीव्र प्रतिक्रिया येत आहेत. आम्ही शांत आहोत याचा अर्थ आम्ही हातबल आहोत असा होत नाही. आमच्या संयमाचा अंत पाहू नका अशी प्रतिक्रिया उदय सामंत यांनी हल्ल्यानंतर दिली आहे. तर हल्लेखोरांना सात ते आठ दिवसांत उत्तर मिळेल असा इशारा तानाजी सावंत यांनी दिला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची देखील या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून, दगड मारून पळून जाणं ही मर्दुमकी नाही. हल्लेखोरांवर कठोर कारवाई करणार असल्याचा इशारा एकनाथ शिंदे यांनी दिला आहे.