अभिजीत पोते, प्रतिनिधी – टीव्ही 9 मराठी | 03 डिसेंबर 2023 : अजित पवार यांनी कर्जतमध्ये झालेल्या मेळाव्यात शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली. त्यावरही राष्ट्रवादीच्या खासदार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी जी टीका केली. त्यावर मला कुणाला स्पष्टीकरण देण्याची गरज वाटत नाही. मी माझा पक्षाला बांधिल आहे. माझ्या कुटुंबाला बांधिल आहे. शरद पवार यांच्यासारखं कमी बोलणं गरजेचं आहे. आपल्या नेत्याने स्पष्टीकरण दिल्यानंतर आपण बोलणं, योग्य नाही, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. सुप्रिया सुळे पुण्यात माध्यमांशी बोलत होत्या.
मी नियमित भ्रष्टजनता पार्टीवर नेहमी टीका करते. अजित पवार गट आणि शिंदे गट यावर मी टीका करणार नाही मात्र भाजपवर मी वैचारिक टीका करते, असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या. आगामी लोकसभा निवडणुकी राष्ट्रवादी किती जागा लढणार, यावर सुप्रिया सुळे यांनी भाष्य केलंय. महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या आम्ही १५ ते १६ जागा लढणार आहोत, असं त्या म्हणाल्या.
अजित पवार यांनी येत्या लोकसभा निवडणुकीत बारामतीची जागा लढवण्याची घोषणा केली आहे. यावरही सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली. मला माहिती नाही माझा समोर कोण उमेदवार असणार आहे. आधी लोकसभा निवडणूक जाहीर होऊ द्या… मग विधानसभा निवडणूक होईल. आधी लगीन कोंढाण्याचं…, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.
आज चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा आज निकाल लागला. अपेक्षा अशी नाही. निवडणुका या स्थानिक पातळीवर असते. या निवडणुक स्थानिक मुद्द्यांवर लढल्या गेल्या. एक्झिट पोल आपण पाहिलं आहेत. थोड्या वेळात निकाल क्लिअर होईल. संध्याकाळपर्यंत कळेल की किती मतं कुणाला मिळाली आहेत. राजस्थान मध्यप्रदेश मागच्यावेळी काँग्रेस जिंकलं होतं. भाजप हरलं होतं. मात्र लोकसभेला वेगळं चित्र समोर आलं होतं, असं त्यांनी म्हटलं.
मध्यप्रदेश मध्ये त्यांनी लाडली नावाची स्कीम चालली आणि शिवराज सिंग यांच्यामुळे भाजपला फायदा झाला. तेलंगणा मध्ये रेवांत रेड्डी यांनी लीड घेतला हे खूप चांगलं आहे. ती स्कीम मध्यप्रदेशमध्ये चालली. पण तेलंगणात चालली नाही. मध्यप्रदेशमध्ये शिवराज सिंह यांची लीडर शिप दिसली, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.
पुण्यातील कोथरूडमध्ये गावरान खाद्य महोत्सव भरला आहे. त्याला सुप्रिया सुळे यांनी हजेरी लावली. बचत गटाच्या माध्यमातून चांगला खाद्य मोहोत्सव भरवला आहे. महिलांना भेटल्यावर मला आनंद झाला, असं यावेळी त्या म्हणाल्या.