Punjab Assembly Election Result LIVE 2022 : पंजाबचे मुख्यमंत्री चरणजित सिंग चन्नी यांचा दोन्ही जागांवर पराभव

| Updated on: Mar 10, 2022 | 5:08 PM

आजच्या विधानसभा निवडणुकांच्या निकालांमध्ये दिग्गजांना पराभवाचं तोंड पाहावं लागलंय. पंजाबमध्ये कॅप्टन अमरिंदरसिंग, मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी, नवज्योत सिंग सिद्धू यांना पराभवाला तोंड द्यावं लागलंय.

Punjab Assembly Election Result LIVE 2022 : पंजाबचे मुख्यमंत्री चरणजित सिंग चन्नी यांचा दोन्ही जागांवर पराभव
पंजाबमध्ये काँग्रेसला मोठा धक्का
Image Credit source: TV9 Marathi
Follow us on

नवी दिल्ली: उत्तर प्रदेश, उत्तराखंड, गोवा, पंजाब आणि मणिपूर या राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल (Assembly Election Result 2022 LIVE) आज जाहीर झाले आहेत. चरणजित सिंग चन्नी (Charanjit Singh Channi), नवज्योत सिंग सिद्धू (Navjyot Singh Sidhu) यांना पराभवाला तोंड द्यावं लागलंय. यूपीसह गोवा, मणिपूर आणि उत्तराखंडमध्ये भाजपला निर्णायक आघाडी मिळालीय. तर, पंजाबमध्ये आपनं सत्ता मिळवलीय. आजच्या विधानसभा निवडणुकांच्या निकालांमध्ये दिग्गजांना पराभवाचं तोंड पाहावं लागलंय. पंजाबमध्ये कॅप्टन अमरिंदरसिंग, मुख्यमंत्री चरणजीत पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत चन्नी यांनी रुपनगर आणि बरनाला दोन जागी निवडणूक लढवली होती. दोन्ही ठिकाणी त्यांचा पराभव झाला आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू याचा देखील पराभव झाला. तर, शिरोमणी अकाली दलाचे पंजाबच्या सुखबीर सिंह बादल यांचा 13 हजार मतांनी पराभव झाला आहे. तर, प्रकाश बादल यांचा देखील पराभव झाला आहे.

पालिकेतून इन्ट्री ते मुख्यमंत्री

चरणजीत सिंह चन्नी हे पंजाबचे 16वे मुख्यमंत्री होते. पंजाबचे पहिले एससी मुख्यमंत्री म्हणूनही त्यांच्याकडे पाहिलं जातं. पंजाब नगरपालिकेच्या माध्यमातून त्यांनी राजकारणात प्रवेश केला होता. काँग्रेसमध्ये येण्याआधी चरणजीत सिंह चन्नी शिरमणी अकाली दलाचे सदस्यही होते. चन्नी यांना कॅप्टन अमरिंदर सिंह यांनीच काँग्रेसमध्ये आणलं होतं. मात्र नंतरच्या काळात पंजाबची राजकीय समीकरणं अशी पलटली की अमरिंदर सिंह यांच्या जागी चरणजीत सिंह यांना मुख्यमंत्री करण्यात आलं होतं.

राजकीय प्रवास

याआधी चरणजीत सिंह चन्नी तंत्रशिक्षण मंत्री होते. चन्नी यांचा जन्म 1 मार्च 1963 साली मकराना कला या गावात झाला. चन्नी खरड नगर परिषदेच्या निवडणुकीत उभे राहिले होते. त्यानंतर दोन वेळा नगर परिषदेचे अध्यक्षही होते. 2007 साली त्यांनी विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी काँग्रेसकडे तिकीट मागितलं होतं. मात्र त्यांना उमेदवारी नाकारण्यात आल्यानं चन्नी यांनी अपक्ष निवडणूक लढवली होती. अपक्ष म्हणून निवडणूक लढवणारे चन्नी 2007 साली आमदार म्हणून निवडूनही आले होते. तेव्हा त्यांनी चमकौर साहिब विधानसभा विधानसभा मतदारसंघातून निवडून आले होते. यानंतर त्यांनी अकाली दलात प्रवेश केला होता.

घरवापसी

2010 साली चन्नी यांची पुन्हा काँग्रेसमध्ये घरवापसी झाली होती. 2012 साली चन्नी यांना काँग्रेसनं तिकीट दिलं होतं. या निवडणुकीत त्यांचा विजयही झाला होता. 2015 साली विरोधी पक्षनेते पदही त्यांना देण्यात आलं. 2017 साली झालेल्या निवडुकीनंतर त्यांना मंत्रिपद देण्यात आलं. चन्नी हे राहुल गांधीचे निकटवर्तीय समजले जातात. म्हणून जेव्हा कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी राजीनामा दिला, त्यानंतर चन्नी यांना मुख्ममंत्री बनवण्यात आलं होतं.

संबंधित बातम्या :

मतदारांचा दणका, पंजाबसह उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांना पराभवाचा झटका

चरणजीत चन्नी यांना धूळ चारणारा खऱ्या अर्थानं ‘आम आदमी’! वाचा कोणंय तो विजयी उमेदवार