नवी दिल्ली : राहुल गांधी यांनी हे लक्षात ठेवावं की, त्यांच्या आजी इंदिरा गांधी यांनीच देशात आणीबाणी लादली होती, असं म्हणत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला आहे. मोदी सरकारला नऊ वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्त भाजपचं मेगा जनसंपर्क अभियान सुरू आहे. त्यासाठी पंजाबमधील होशियारपूरमध्ये कार्यक्रम आयोजित केला होता. तिथे बोलताना नड्डा यांनी राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला आहे.
राहुल गांधी यांनी परदेश दौऱ्यादरम्यान केलेल्या वक्तव्यांवर जे पी नड्डा यांनी टीका केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जगभरात भारताची प्रतिमा उंचावत असताना ‘काँग्रेसचे युवराज’ राहुल गांधी देशाची प्रतिमा डागाळत आहेत, असाही घणाघात जे पी नड्डा यांनी केला आहे.
केवळ भाजप हाच विचारधारेवर आणि कार्यकर्त्यांवर आधारित पक्ष आहे. उर्वरित राजकीय पक्षांना कोणतीही विचारधारा नाही, असा घणाघातही नड्डा यांनी केला आहे.
याआधीही जे पी नड्डा यांनी राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला आहे. हिमाचलच्या कुल्लूमध्ये बोलतानाही त्यांनी काँग्रेसवर टीका केली. मागच्या 70 वर्षात जे काम झालं नाही ते मागच्या नऊ वर्षात झालं आहे, असं नड्डा म्हणालेत.
ज्या व्यक्तीची आजी इंदिरा गांधींनी देशात आणीबाणी लादली होती. लोकशाहीचा आवाज दाबला होता. ती व्यक्ती आपल्या परदेश दौऱ्यामध्ये, भारतविरोधी लोकांच्या भेटीदरम्यान लोकशाही धोक्यात असल्याचं म्हणत आहे, असंही टीकास्त्र नड्डा यांनी डागलंय.
आज महा-जनसंपर्क अभियान के अंतर्गत पंजाब के होशियारपुर में आयोजित जनसभा को संबोधित किया।
आदरणीय प्रधानमंत्री श्री @narendramodi जी के नेतृत्व में विगत 9 वर्षों में गरीब कल्याण व अधोसंरचना निर्माण की दिशा में ऐतिहासिक कार्य हुए हैं।
‘अमृतकाल’ की इस अवधि में हम सभी अपने समर्पण व… pic.twitter.com/6rrIGV9Jll
— Jagat Prakash Nadda (@JPNadda) June 14, 2023
जे पी नड्डा यांनी ट्विटरवर फोटो शेअर केलेत. यात त्यांनी मोदी सरकारच्या कार्याचा आढावा घेतला आहे. तसंच भविष्यातील योजनांचाही आढावा घेतला आहे. “आज महा-जनसंपर्क अभियान पंजाब के होशियारपूरमध्ये आयोजित जनसभेला संबोधित केलं. आदरणीय नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात मागच्या 9 वर्षांमध्ये गरीब कल्याण करण्याच्या दिशेने ऐतिहासिक कार्य केलं जात आहे. या ‘अमृतकाल’मध्ये आपल्या सगळ्यांचं योगदान आवश्यक आहे. 2047 पर्यंत भारताला विकसित देश करण्याचं मोदीजींचं लक्ष आहे. त्यासाठी प्रयत्न करणं आवश्यक आहे”, असं नड्डा आपल्या ट्विटमध्ये म्हणाले आहेत.