राधाकृष्ण विखे पाटील मनाने भाजपवासी, भाजपच्या बैठकीला हजेरी!

| Updated on: Jul 05, 2019 | 4:04 PM

अहमदनगर : काँग्रेस नेते राधाकृष्ण विखे पाटील हे मनाने भाजपवासी झाल्याचं चित्र आहे. कारण राधाकृष्ण विखे पाटील हे भाजपच्या बैठकांना हजेरी लावत आहेत. विखे पाटील भाजपच्या बैठकीला हजर राहिल्याचा फोटो सध्या व्हायरल झाला आहे. अहमदनगर लोकसभा मतदारसंघात राधाकृष्ण विखेंचे सुपुत्र सुजय विखे हे भाजपकडून रिंगणात आहेत. काँग्रेसने सुजय यांना तिकीट न दिल्याने ते भाजपमध्ये गेले. […]

राधाकृष्ण विखे पाटील मनाने भाजपवासी, भाजपच्या बैठकीला हजेरी!
Follow us on

अहमदनगर : काँग्रेस नेते राधाकृष्ण विखे पाटील हे मनाने भाजपवासी झाल्याचं चित्र आहे. कारण राधाकृष्ण विखे पाटील हे भाजपच्या बैठकांना हजेरी लावत आहेत. विखे पाटील भाजपच्या बैठकीला हजर राहिल्याचा फोटो सध्या व्हायरल झाला आहे.

अहमदनगर लोकसभा मतदारसंघात राधाकृष्ण विखेंचे सुपुत्र सुजय विखे हे भाजपकडून रिंगणात आहेत. काँग्रेसने सुजय यांना तिकीट न दिल्याने ते भाजपमध्ये गेले. शिवाय मुलाला तिकीट मिळवून देऊ न शकल्याने राधाकृष्ण विखेही नाराज आहेत. त्यांनी विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिला.

वाचा: विखे पाटील आणि मोहिते पाटलांच्या भाजप प्रवेशाच्या तारखा ठरल्या! 

त्यानंतर राधाकृष्ण विखे पाटील यांनी मुलगा सुजयच्या प्रचारात सक्रीय भाग घेतला आहे. राधाकृष्ण विखे पाटील हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचं सांगण्यात येत आहे. नरेंद्र मोदी यांची 12 तारखेला म्हणजेच उद्या नगरमध्ये जाहीर सभा होत आहे. या सभेत राधाकृष्ण विखे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती आहे.

गेल्या महिन्यात 12 मार्चला मुंबईतील वानखेडे स्टेडियममधील गरवारे क्लबमध्ये सुजय विखे पाटलांच्या भाजप प्रवेशाचा सोहळा पार पडला. ‘एकच वादा, सुजय दादा’ अशा घोषणा देत गरवारे क्लब सुजय विखेंच्या कार्यकर्त्यांनी दणाणून सोडला. नगरमधून मोठ्या संख्येत सुजय विखेंचे समर्थक या सोहळ्यासाठी मुंबईत आले होते.

आता येत्या 12 एप्रिलला अहमदनगरमध्ये राधाकृष्ण विखे पाटील भाजपमध्ये 12 चा मुहूर्त साधून प्रवेश करणार असल्याचं सांगण्यात येत आहे.

संबंधित बातम्या 

सुजयप्रमाणे राधाकृष्ण विखेही 12-12 चा मुहूर्त साधणार? 

राधाकृष्ण विखे पाटीलही भाजपमध्ये?, मोदींच्या सभेत प्रवेशाची शक्यता  

पवारांच्या मनात द्वेष, राष्ट्रवादीचा प्रचार करणार नाही : राधाकृष्ण विखे पाटील  

सुजयविरोधात प्रचार करणार नाही : विखे पाटील  

मी दुसऱ्यांची पोरं धुणीभांड्यासाठी वापरुन घेत नाही : उद्धव ठाकरे 

रणजितसिंह मोहिते पाटलांचा भाजप प्रवेश निश्चित?