नांदेडः भारत जोडो (Bharat Jodo) यात्रेवर असलेल्या राहुल गांधी यांच्या संवेदनशीलतेचं आज सर्वत्र कौतुक होतंय. कारण ठरलंय, नांदेडमधला एक प्रसंग. राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची यात्रा सध्या नांदेडमध्ये आहे. यात्रेत त्यांना असंख्य नागरिक भेटायला येत आहेत. यात लहानांपासून वृद्धांपर्यंत अनेकजण आहेत. या सगळ्यांमध्येच होता नांदेडमधला सर्वेश हाटणे.
दिल्लीचे काँग्रेस नेते आपल्या इथे आलेत, हे पाहून सर्वेशदेखील भारत जोडो यात्रेत राहुल गांधी यांना भेटण्यासाठी आला. राहुल गांधींनी त्याची भेट घेतली. भविष्यात तुला काय बनायचंय, हे विचारलं.
Congress President Shri @Kharge, in the presence of Shri @RahulGandhi handed over a PC to Sarvesh Hatne, a young tech enthusiast & Padyatri. A little gesture from our end to help him discover more.#BharatJodoYatra pic.twitter.com/5mS78HRp7p
— All India Mahila Congress (@MahilaCongress) November 11, 2022
त्याने सॉफ्टवेअर इंजिनिअर व्हायचंय, असं सांगितलं. पण कंप्यूटर येतं का, असं विचारलं असता, त्याने नाही असं उत्तर दिलं.
राहुल गांधी यांनी संवेदनशीलता दाखवत आज त्याला कंप्यूटर भेट म्हणून दिलं. काँग्रेस नेते मल्लिकार्जून खरगे यांच्या उपस्थितीत एक लहानसा कार्यक्रम घेत सर्वेशला कंप्यूटर देण्यात आलं.
एवढंच नाही तर सर्वेशला आणि त्याच्या मित्राला राहुल गांधी यांनी कंप्यूटर कसं चालवायचं, यू ट्यूब, इंटरनेटवर कसं पहायचं याचीही प्राथमिक माहिती दिली.
Carrying the hopes of 1.3 billion Indians.
Shri @RahulGandhi leading the fight against BJP’s injustices.#BharatJodoYatra?? pic.twitter.com/axVdTJCYzV
— All India Mahila Congress (@MahilaCongress) November 10, 2022
राहुल गांधींनी दाखवलेल्या या संवेदनशीलतेचं सध्या जोरदार कौतुक होतंय. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते गजानन काळे यांनीदेखील राहुल गांधी यांच्या संवेदनशीलतेवर एक ट्विट केलंय..
सॉफ्टवेअर इंजिनिअर बनायचे स्वप्न बाळगणाऱ्या नांदेडच्या सर्वेश हाटणेला परिस्थितीमुळे कॉम्प्युटर सुध्दा पाहता आला नाही हे लक्षात ठेवून त्याला राहुल गांधी यांनी आज कॉम्प्युटर भेट दिला …
राजकारण चालत राहील पण ही संवेदनशीलता कायम अशीच राहो … #RahulGandhi ❤️? pic.twitter.com/hCBnYFZhQB
— Gajanan Kale (@GajananKaleMNS) November 11, 2022
ही संवेदनशीलता जिवंत राहो, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या आहेत.