नवी दिल्ली : काँग्रेसची भारत जोडो (Bharat Jodo Yatra) यात्रा सध्या सुरु आहे. ही यात्रा सध्या हरियाणामध्ये आहे. या पदयात्रेदरम्यान काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. रोजगाराच्या मुद्द्यावर त्यांना प्रश्न विचारण्यात आला तेव्हा त्यांनी तरूणाईच्या हाताला काम कसं मिळेल, यावर भाष्य केलं.
शेती आणि शेतीवर आधारित उद्योग वाढायला हवेत.या उद्योगांचं जाळं पसरवलं जाईल तेव्हा या औद्योगिकीकरणातून करोडो लोकांना रोजगार प्राप्त होईल. हा रोजगार सन्मानाने मिळेल, असं राहुल गांधी म्हणालेत.
लघु उद्योगांमधून लोकांच्या हाताला काम मिळेल. पण सध्या हे उद्योग उद्धवस्त झालेत. त्यांना पूर्वपदावर आणणं गरजेचं आहे. पण सध्या लहान उद्योग उरलेले नाहीत. मोठे उद्योगपती अधिक वाढत आहेत. पण या लहान उद्योगांना पुनर्जिवित करणं गरजेचं आहे. या लहान उद्योगांतून अनेकांना रोजगार मिळेल, असं राहुल गांधी यांनी सांगितलं.
सध्या तरूणांशी खोटं बोललं जातंय. मी सध्या फिरतोय, तरूणांशी बोलतोय.तेव्हा इंजिनिअर, डॉक्टर, वकील, सैन्य, सरकारी अधिकारी होण्याची इच्छा अनेकांनी बोलून दाखवली. जास्तीत जास्त त्यातील 10 टक्के लोकांना यात नोकरी मिळेल. बाकीच्यांना ही नोकरी नाही मिळणार हे सत्य आहे. याची जाणीव या तरूणाईल करून देणं गरजेचं आहे, असं राहुल गांधी म्हणालेत.
पदयात्रेदरम्यान एक लहान मुलगी माझ्याजवळ आली. तीला विचारलं तुला मोठं होऊन काय व्हायची इच्छा आहे? ती म्हणाली, मला आयएएस अधिकारी व्हायचंय. तिला विचारलं दरवर्षी किती लोक यात निवडले जातात तर ती म्हणाली, पाच लाख लोक. त्यावर मी म्हटलं की असं नाहीये. दीडशे लोकांना फक्त यात नोकरी लागते. त्यानंतर ती मुलगी रडायला लागली.तर लहान मुलांशी अशाप्रकारे खोटं बोलून चालणार नाही. त्यांना वास्तवाचं भान करून देणं गरजेचं असल्याचं त्यांनी म्हटलंय.
राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा ‘डरो मत’चा नारा दिलाय. तपस्या करा, घाबरू नका, असं ते म्हणालेत. बुद्धाचा फोटो पाहिलाय? गुरूनानक, महावीर यांच्या फोटोतही तुम्ही अभय मुद्रा तुम्ही पाहिली असेल. ही आपल्याला जगण्याचं बळ देते. त्यामुळे घाबरू नका, असं राहुल गांधी म्हणालेत.