मुंबई : काँग्रेसची भारत जोडो यात्रा सध्या सुरु आहे.ही यात्रा सध्या दिल्ली आहे. यादरम्यानच्या पत्रकार परिषदेत राहुल गांधी यांना एक प्रश्न विचारण्यात आला. वरूण गांधी (Varun Gandhi) काँग्रेसमध्ये येणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. त्यावर राहुल गांधींना (Rahul Gandhi) प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा त्यांनी उत्तर दिलं.
राहुल गांधी यांचे चुलत बंधू आणि भाजपचे खासदार वरुण गांधी काँग्रेसमध्ये सामील होणार आहेत का?, असा प्रश्न टीव्ही9 ने विचारला तेव्हा राहुल गांधी यांनी उत्तर दिलं. “वरुण गांधी काँग्रेसमध्ये येणार की नाही हा प्रश्न मला विचारण्यापेक्षा मल्लिकार्जून खर्गे यांना विचारा. ते याचं योग्य उत्तर देतील”, असं राहुल गांधी म्हणालेत.
“वरूण गांधी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार की नाही यांचं उत्तर खर्गेजी देतील. पण भारत जोडो यात्रेत जे कुणी येतील त्यांचं स्वागतच आहे. वरूण गांधी जरी भारत जोडो यात्रेत आले तरी त्यांचं स्वागतच आहे. पण ते सध्या भाजपमध्ये आहेत. भारत जोडो यात्रेत सहभागी झाल्याने भाजप त्यांच्यावर नाराज होईल”, असं राहुल गांधी म्हणालेत.
पुढची 2024 ची लोकसभा निवडणूक भाजपसाठी कठीण असणार आहे. जसा विजय त्यांनी 2019 ला मिळवला. तसं त्यांना यंदा मिळवता येणार नाही. ग्रामीण भागात, सर्वसामान्यांच्या मनात भाजपच्या विरोधी वातावरण आहे.
मी सध्या भारत जोडोच्या माध्यमातून लोकांना भेटलो आहे. लोक मला येऊन सांगतात की त्यांना किती त्रास होतोय. सरकारी योजना पोहोचत नाहीत. सामान्यांच्या खिशात सध्या पैसा नाहीये. त्यामुळे केंद्र सरकार विरोधात सध्या सगळं वातावरण आहे. यंदाची निवडणूक भाजपसाठी सोपी नाही, असं राहुल गांधी म्हणालेत.