जम्मू : राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा सध्या जम्मू येथे जाऊन पोहचली आहे. बनिहलमध्ये ही यात्रा जाऊन पोहचली आहे. भारत जोडो यात्रेला सुरक्षा न मिळाल्याने ही यात्रा कॉंग्रेसच्या वतिने थांबविण्यात आली आहे. जोपर्यंत सुरक्षा मिळणार नाही तोपर्यंत यात्रा पुढे जाणार नाही असा पवित्रा कॉंग्रेसने घेतला आहे. या भारत जोडो यात्रेत कॉंग्रेसचे अनेक मोठे नेते सहभागी झाले आहे. कन्याकुमारी पासून सुरू झालेली यात्रा थेट जम्मू येथे जाऊन पोहचली आहे. दुसऱ्या टप्प्यातील ही यात्रा सुरू असून राहुल गांधी यांचा हजारो किलोमीटरचा पायी प्रवास झाला आहे. जम्मू येथे नुकतेच महाराष्ट्रातून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हे सहभागी झाले होते. जम्मू येथे जाऊन पोहचलेली भारत जोडो यात्रा सुरक्षाच्या मुद्द्यावरून चर्चेत आली आहे. जम्मू येथील सरकारने सुरक्षा न दिल्याने ही यात्रा खोळंबली आहे. कॉंग्रेसचे नेतेही सुरक्षेवरुन आग्रही आहेत.
कन्याकुमारी पासून सुरू झालेली भारत जोडो यात्रा आता जम्मूत जाऊन पोहचली आहे. विविध कारणांनी भारत जोडो यात्रा चर्चेत आली आहे.
जम्मूतील बनिहलमध्ये ही यात्रा मात्र अचानक थांबविण्यात आली आहे. कॉंग्रेसच्या नेत्यांनी भारत जोडो यात्रेला सुरक्षा न दिल्याने ही यात्रा थांबविल्याचे समोर आले आहे.
राहुल गांधी यांच्यासह या भारत जोडो यात्रेत कॉंग्रेसचे बडे नेते सहभागी झाले असून सुरक्षा न दिल्याने कॉंग्रेसचे नेते आक्रमक झाले आहे.
जम्मू सरकारने सुरक्षा न दिल्याने कॉंग्रेसकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. कन्याकुमारीपासून राहुल गांधी यांच्या यात्रेला प्रत्येक राज्यात सुरक्षा मिळाली होती. अचानक जम्मूत सुरक्षा नसल्याने नवा वाद उभा राहण्याची शक्यता आहे.