केंद्रीय मंत्रिमंडळाचे मनापासून अभिनंदन : राज ठाकरे

| Updated on: Feb 05, 2020 | 2:29 PM

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केंद्रीय मंत्रिमंडळाचं अभिनंदन केलं आहे. राम मंदिरासाठी ट्रस्टची स्थापना केल्याने राज ठाकरे (Raj Thackeray Ram Mandir) यांनी मोदींच्या मंत्रिमंडळाचं कौतुक केलं.

केंद्रीय मंत्रिमंडळाचे मनापासून अभिनंदन : राज ठाकरे
Follow us on

मुंबई :  मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केंद्रीय मंत्रिमंडळाचं अभिनंदन केलं आहे. राम मंदिरासाठी ट्रस्टची स्थापना केल्याने राज ठाकरे (Raj Thackeray Ram Mandir) यांनी मोदींच्या मंत्रिमंडळाचं कौतुक केलं. राज ठाकरे (Raj Thackeray Ram Mandir) यांनी ट्विट करुन आपली प्रतिक्रिया दिली. राज ठाकरे म्हणाले, “केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज ‘श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र’ ह्या ट्रस्टच्या स्थापनेला मंजुरी दिली गेली.  या निर्णयामुळे अयोध्येतील राम मंदिराच्या उभारणीला आता वेग येईल अशी अपेक्षा. या निर्णयासाठी संपूर्ण मंत्रिमंडळाचे मनापासून अभिनंदन”.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत आज राम मंदिरबाबत निवेदन दिलं. मोदी कॅबिनेटने आज राम मंदिर ट्रस्टला मंजुरी दिली आहे. मंदिर उभारण्यासाठी जी ट्रस्ट स्थापन करण्यात आली आहे, त्या ट्रस्टला श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र (Sri Ram Janambhoomi Tirath Kshetra) असं नाव देण्यात आलं आहे. या ट्रस्टच्या स्थापनेबद्दल, राज ठाकरे यांनी मोदी सरकारचं कौतुक केलं.

उद्धव ठाकरेंकडूनही अभिनंदन

अयोध्येत राम मंदिर उभारणीसाठी ट्रस्टची स्थापना केल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत केली. त्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नरेंद्र मोदींचं अभिनंदन (Uddhav Thackeray congratulates Modi) केलं आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ट्विटरवरुन यासंदर्भात माहिती दिली.

‘अयोध्येत भव्य राम मंदिर उभारणी करण्याचा ऐतिहासिक निर्णय देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने दिला. त्या निर्णयाची अंमलबजावणी करणे, हे सरकारचे कर्तव्यच होते. पंतप्रधान मोदी यांनी न्यायालय निर्णयाची अंमलबजावणी करण्याचे कर्तव्य पार पाडल्याबद्दल अभिनंदन : उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री’ असं ट्वीट संजय राऊत यांनी केलं आहे.

पंतप्रधानांचं लोकसभेत निवेदन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत आज राम मंदिरबाबत निवेदन दिलं.  मोदी म्हणाले, “श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्ट अयोध्येत भव्य-दिव्य श्रीराम मंदिर निर्माण आणि संबंधित विषयांवर निर्णय घेण्यासाठी स्वतंत्र असेल” (Sri Ram Janambhoomi Tirath Kshetra)

भारताच्या प्राणवायूत, आदर्शात सर्वत्र प्रभू श्रीराम आणि अयोध्येचं ऐतिहासिक महत्व आहे. अयोध्येत प्रभू रामाचं भव्य मंदिर आणि भविष्यात भाविकांची संख्या आणि श्रद्धा पाहता, सरकारने निर्णय घेतला आहे. अयोध्या कायद्यानुसार अधिगृहित सर्व जमीन 67 एकर ज्यामध्ये आत आणि बाहेरील अंगणाचा समावेश आहे, ती श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्राला सोपवण्यात येईल असं मोदींनी सांगितलं. सुप्रीम कोर्टाचे निर्देश, अनेक चर्चांनंतर आम्ही अयोध्येत सुन्नी वक्फ बोर्डाला 5 एकर जमीन मंजूर केली आहे, असं मोदी म्हणाले.