मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज पत्रकार (Raj Thackeray corona press conference) परिषद घेऊन, कोरोना, लॉकडाऊन, मरकज, प्रशासन, सरकार या सर्व विषयांवर भाष्य केलं. लोकांना गांभीर्य नसल्याने लॉकडाऊन वाढण्याची शक्यता राज ठाकरे यांनी व्यक्त केली. याशिवाय राज ठाकरे यांनी दिल्लीतील निजाम्मुद्दीन इथं तब्लिगी जमातच्या कार्यक्रमावरही हल्लाबोल केला. (Raj Thackeray corona press conference)
“दिल्लीला मरकजचा प्रकार घडला. अशा लोकांना गोळ्या घातल्या पाहिजेत. यांना कसली ट्रिटमेंट देताय तुम्ही? यांना स्वतंत्र विभाग करावा आणि त्यांची ट्रिटमेंट बंद करुन टाकावी. त्यांना याही दिवसांमध्ये धर्म मोठा वाटत असेल आणि काही कारस्थान करायचं असेल की देश संपवू. नोटांना थुंकी लावतात, भाज्यांना थुंकी लावत आहेत. नर्सेससमोर नग्न फिरत आहेत. लोकांच्या अंगावर थुकतात. या लोकांना फोडून काढण्याचे व्हिडीओ बाहेर निघायला पाहिजेत, तर लोकांना काहीतरी विश्वास बसेल”, असा हल्लाबोल राज ठाकरे यांनी केला.
मुसलमानांमधील काही औलादी आहेत जे काही असे कृत्य करत आहेत अशांना ठेचलं पाहिजे. त्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवावी लॉकडाऊन देशात काही दिवसांसाठीच आहे, नंतर आम्ही आहोतच, असा इशार राज ठाकरे यांनी दिला.
लोकं अशाप्रकारे एकत्र आले आणि कोरोना वाढत राहिला तर लॉकडाऊन वाढतच राहणार. आज सामाजाची सर्वात मोठी जबाबदारी आहे. नुसतं सुशिक्षित असून चालत नाही सुज्ञही असावं लागतं. ही वेळ सरकारवर आरोप करण्याची नाही, असं राज ठाकरे म्हणाले.
आपण शिस्त पाळली नाही तर मोठं आर्थिक संकट येईल. पंतप्रधान आले तेव्हा ते काहीतरी बोलतील असं वाटलं होतं. जे लॉकडाऊन पाळत आहेत त्यांच्या मनात भीती निर्माण झाली आहे. राशन मिळणार का? कालांतराने नोकरी राहील का? बॉर्डर सील केल्यात तर मग भाजीपालाचे ट्रक येतील का? जे शिस्त पाळत नाहीत त्यांच्यामुळे या सगळ्या गोष्टी घडतात. बातम्या येतात तेव्हा वाटतं अरे असं कसं हे घडू शकतं.
पंतप्रधानांनी सागितलंय की, 9 वाजता दिवे लावायचे, मेणबत्ता पेटवायचे. पेटवतील लोकं. नाहीतरी घरात बसून करतील काय? हा श्रद्धेचा किंवा अंधश्रद्धेचा विषय असेल त्याच्याने परिणाम होत असेल तर कोरोनावर त्याने परिणाम होवो. परंतु, नुसतं दिवे घालवून, मेणबत्या पेटवून, टॉर्च लावून यापेक्षा मला असं वाटतं पंतप्रधानांच्या भाषणामध्ये एक आशेचा किरण जरी असता तरी लोकांना समाधान वाटलं असतं, असं राज ठाकरे म्हणाले.
LIVE – राज ठाकरे यांची संपूर्ण पत्रकार परिषद
संबंधित बातम्या